पालकमंत्री बैठक

पालकमंत्री बैठक

01025


खत टंचाई भासणार नाही असे नियोजन करा
पालकमंत्री दीपक केसरकर; खरीप हंगामपूर्व बैठकीत दिल्या सूचना
कोल्हापूर, ता. ६ : ‘शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून कृषी विभागाच्या योजनांची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा. खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई भासू नये याची दक्षता घ्या, शेतकऱ्यांना बियाणे आणि खते वेळेवर मिळतील अशा दृष्टीने नियोजन करा,’ अशा सूचना शालेय शिक्षण तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ताराराणी सभागृहात आज केसरकर यांच्या अध्यक्षतखाली झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रकाश सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात उसाखालील क्षेत्र अधिक असून ऊस उत्पादकता वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा. मान्सूनची स्थिती लक्षात घेवून कृषी विभागाने आतापासूनच नियोजन करावे.’ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना समान पातळीवर खताचे वाटप करण्यात यावे तसेच विविध कंपन्यांच्या बियाणांची गुणवत्ता (उगवण क्षमता) तपासून घेण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. कृषी विभागाने आतापर्यंत समाधानकारक कामकाज केले असल्याचे सांगून त्यांनी या विभागाचे कौतुक केले.
‘युरिया व डीएपी रासायनिक खतांचा पुरवठा दुर्गम भागातील पुरेशा व सम प्रमाणात करण्यात यावा’, अशी अपेक्षा आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली. शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीच्या प्रश्नांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाकडे मंत्रालयस्तरावर पालकमंत्र्यांनी एका बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी राजेंद्र पाटील यड्रावकरांनी केली. तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना खतांचे वाटप वेळेवर आणि समान व्हावे, अशी सूचना प्रकाश आवाडे यांनी केली. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com