इचल: डीकेटीई वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: डीकेटीई वृत्त
इचल: डीकेटीई वृत्त

इचल: डीकेटीई वृत्त

sakal_logo
By

ich61.jpg
---------------
01054
इचलकरंजी ः दुग्धउत्पादन वाढीसाठी तयार केलेल्या प्रकल्पासोबत मागदर्शक व विद्यार्थी.

दुग्धउत्पादन वाढीसाठी अनोखा प्रकल्प
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे संशोधन; उष्ण तापमानाच्या त्रासातून जनावरांची सुटका

इचलकरंजी, ता. ६ ः येथील डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलीकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचे दुग्धउत्पादन वाढीसाठी ‘ॲडव्हान्सड शेल्टरींग टेक्नॉलॉजी युजिंग टेक्निकल टेक्स्टाईल ॲण्ड आयओटी’ हा अनोखा प्रकल्प विकसित केलेला आहे. प्रा. व्ही. बी. सुतार यांच्या मागदर्शनाखाली शुभांगी वाटेगावकर, ॠतूजा वडगे व पवन वर्मा या विद्यार्थ्यांनी प्रकल्प विकसित केला आहे.
भारत कृषीप्रधान देश असून शेती मुख्य व्यवसाय आहे. शेतीवर आधारित दुग्धव्यवसाय आर्थिक कणा असून व्यवसायात शेतक-यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी उष्म हवामानामुळे दुग्ध उत्पादनातील घट या समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस हवेतील उष्मा व तापमान वाढत असल्याचे प्रमुख कारण म्हणजे प्रदूषण व ग्लोबल वार्मिंग आहे. या गोष्टींचा डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी जनावरांच्या गोठयामध्ये टेक्निकल टेक्स्टाईल इन नॉनवोव्हन व आयओटी कार्यप्रणालीचा वापर करुण दुग्धउत्पादन वाढीसाठी प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पामुळे जनावरांना बाहेरील तापमानाचा त्रास होणार नाही. यामुळे दुग्धउत्पादन वाढेल. प्रकल्पात वॉटर ॲटोमेशन सिस्टीमद्वारे नॉनवोव्हन कापड पूर्णपणे ओले ठेवले जाते. जोपर्यंत गोठयातील तापमान कमी होत नाही तोपर्यंत हे कापड ओलेच राहते. कापड भिजून शिल्लक राहिलेले पाणी पुन्हा रिसायकलव्दारे टाकीमध्ये साठवले जाते. त्यामुळे पाणी वाया जात नाही. तसेच तापमान, आर्द्रता, खेळती हवा, टाकीतील पाण्याची पातळी, नॉनओव्हन कपडयातील पाण्याचा ओलावा या सर्व गोष्टी इंटरनेटशी जोडल्यामुळे आपल्याला त्या कोठूनही पाहता, कंट्रोल करता येतात. या नावीन्यपूर्ण प्रकल्पाबद्दल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ. एस. ए. पाटील व आयडिया लॅबचे डॉ. व्ही. डी. शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.