पंचगंगा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू
पंचगंगा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू

पंचगंगा नदीत तरुणाचा बुडून मृत्यू

sakal_logo
By

पंचगंगेत बुडालेल्या
युवकाचा मृतदेह सापडला

कोल्हापूर, ता.६ : शुक्रवारी (ता. ५) दुपारी पंचगंगा नदीत पोहताना बुडालेला तरुण पृथ्वीराज चंद्रकांत गवळी (वय २०, रा. शनिवार पेठ, कोल्हापूर) याचा मृतदेह शनिवारी (ता. ६) दुपारी शिवाजी पुलानजीक सापडला. सीपीआरमध्ये शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, डिप्लोमाचे शिक्षण घेणारा पृथ्वीराज शुक्रवारी दुपारी मित्रांसोबत पंचगंगा नदीत पोहोण्यासाठी गेला होता. बराच वेळ पोहोल्यानंतर तो पाण्यात बुडाला. मित्रांनी याची माहिती पृथ्वीराजच्या नातेवाईकांना क‌ळवली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी पंचगंगा नदीत पृथ्वीराजची शोधमोहीम सुरू केली. अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली होती. शनिवारी सकाळी पुन्हा मृतदेहाचा शोध सुरू केला. अखेर जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी पाणबुडीच्या मदतीने मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला. पृथ्वीराज हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.