
रायझिंग स्टार फुटबॉल स्पर्धा सोमवार पासून
रायझिंग स्टार फुटबॉल स्पर्धा सोमवार पासून
कोल्हापूर, ता. ६ : शिवाजी कला क्रीडा सांस्कृतिक आणि शैक्षणिक ट्रस्टतर्फे सोमवार १५ ते २५ मे दरम्यान १५ व १८ वर्षाखालील मुलांकरिता छत्रपती शिवाजी महाराज रायझिंग स्टार फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेमार्फत दरवर्षी शालेय फुटबॉल स्पर्धा वेट्रन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यानुसार रायझिंग स्टार स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठ मे पासून निवड चाचणी शिवाजी स्टेडियमवर होणार आहे. याकरिता ४०० हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यातून संघाची निवड होऊन संघ बनवले जाणार आहेत. संघातील खेळाडूंना किट दिले जाणार आहेत. तर विजेत्या संघाना रोख रक्कम व चषक आणि राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा भेट दिली जाणार आहे. या वेळी किरण साळुंखे ,प्रमोद भोसले, दिलीप माने ,उदय पाटील, विनायक फाळके, महावीर पोवार, लखन पाटील आदी उपस्थित होते.