जुना बुधवार , दिलबहार चे विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुना बुधवार , दिलबहार चे विजय
जुना बुधवार , दिलबहार चे विजय

जुना बुधवार , दिलबहार चे विजय

sakal_logo
By

००९६३
‘जुना बुधवार, दिलबहार’चे विजय 
कोल्हापूर, ता. ६ : शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळाने सोल्जर्स ग्रुपवर २ विरुद्ध १ अशा गोल फरकाने विजय मिळवला. दिलबहार तालीम मंडळाने बीजीएम स्पोर्टस्‌ संघावर १ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे. 
जुना बुधवार विरुद्ध सोल्जर्स ग्रुप यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. आक्रमक चाली रचणाऱ्या सोल्जर्स संघाने जुना बुधवार संघावर दबाव निर्माण केला. जुना बुधवारकडून आक्रमक खेळ होत असताना सोल्जर्सच्या बचाव फळीने उत्तम भूमिका बजावली. सामान्याच्या २२ व्या मिनिटाला जुना बुधवारच्या सचिन मोरे याने गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. सोल्जर्सकडून सातत्याने आक्रमक खेळ होत राहिला. पूर्वार्धाच्या अधिक वेळेत संधी निर्माण करत सोल्जर्सच्या रोहित देसाई याने गोल नोंदवून सामना १ - १ असा बरोबरीत आणला. उत्तरार्धात दोन्ही संघानी तुल्यबळ खेळ केला. आघाडीचे आक्रमण, मध्य फळीकडून प्रतिस्पर्धी संघावर दबाव तर बचाव फळीने उत्कृष्ट बचाव करत सामन्यात रंगात आणली. सामना संपण्यास काही वेळ असताना अधिकच्या वेळेत जुना बुधवारच्या प्रकाश संकपाळ याने गोल नोंदवून संघाला निसटता विजय मिळवून दिला.   
दिलबहार संघाने बीजीएम संघावर सातत्याने दबाव राखत एकतर्फी विजय मिळवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या दिलबहार संघाने आक्रमक खेळ केला. मात्र, अनेक संधी वाया गेल्या. बीजीएमच्या बचाव फळीने चांगला खेळ करत अनेक आक्रमणे थोपवली. सामन्याच्या ३० व्या मिनिटाला दिलबहारच्या खुर्शीद अली याने गोल नोंदवून संघाला १ - ० अशी आघाडी मिळवून दिली. दरम्यान, वैभव राऊत याच्या तीन तर व्हिक्टरच्या चार संधी वाया गेल्या. दिलबहारला उत्तरार्धात फ्री किक मिळाली; मात्र व्हॅलेंटाईन याचा फटका गोल खांबाला लागून बाहेर गेला. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहत दिलबहारने सामना १ - ० असा ने जिंकला. 

आजचा सामना 
संध्याकाळी चार - श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ