- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-
-

-

sakal_logo
By

ताराबाई अण्णासाहेब नरदे हायस्कूल
नरदे हायस्कूलमध्ये आदिनाथ नरदे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सकाळी दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध राहून महाराजांना अभिवादन केले. या वेळी सागर शंभूशेटे, मुख्याध्यापिका पी.पी.देसाई, स्नेहल क्षीरसागर, पी.एन. दिवटे, एस. एस. पाटील, व्ही. एस. भगाटे, पी.आर. पाटील,.बी.एस.जाधव ,.एस.ए. गरड, पी.जी. सुतार, ए. ए. शिरगावे उपस्थित
होते. सूत्रसंचालन व आभार एस. बी. जैनापुरे यांनी केले.

कन्या महाविद्यालय व्याख्यान
इचलकरंजीतील कन्या महाविद्यालय सांस्कृतिक विभाग व इतिहास विभाग यांच्यातर्फे ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची समकालीन प्रस्तुतता" या विषयावर इतिहास विभाग प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांचे व्याख्यान झाले. शिक्षण प्रसाराकरीता केलेल्या विविध सुविधा, मोफत व सक्तीचे शिक्षण, विविध जाती धर्माचे बोर्डिंग, जलनीती धोरण, व्यापारी पेठाची स्थापना, सामाजिक रुढींना मोडीत काढून ब्राह्मणेतर यांच्या करिता केलेले कार्य याबाबत अतिशय अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण मार्गदर्शन डॉ. शिंदे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. त्रिशला कदम होत्या. प्रा. संगीता पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. विठ्ठल नाईक यांनी केले. प्रा. वर्षा पोतदार यांनी आभार मानले. प्रा संदिप पाटील यांन सूत्रसंचालन केले.