एसआयआयएलसी

एसआयआयएलसी

लोगो - एसआयआयएलसी
००००००००००००००
आता व्यावसायिक लोणचे
बनविण्याचे मिळवा मार्गदर्शन
कोल्हापुरात १०, ११ ला प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण

कोल्हापूर, ता. ६ : सध्याच्या हंगामात प्रत्येक घरात लोणच्याची वाढती मागणी असते. लोणचे एक असा खाद्यपदार्थ आहे, जो केवळ स्वतःच स्वादिष्ट नसून आपले जेवण अधिक स्वादिष्ट बनवते. स्वतः घरी लोणची बनविण्यापेक्षा बाजारातून लोणचे विकत घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. या परिस्थितीत व्यावसायिक पद्धतीची विविध लोणची बनवून चांगला व्यवसाय करता येऊ शकतो. अशी सुमारे दहा प्रकारची लोणची व्यावसायिकदृष्ट्या कशी बनवावीत, त्यासाठी आवश्यक साधनसामग्री, व्यवसाय कसा सुरू करावा, याबाबत इत्थंभूत मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय प्रशिक्षण १० आणि ११ मे रोजी सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे सकाळ कार्यालयात आयोजिले आहे.
याशिवाय लोणच्यांची बाजारपेठेतील मागणी, लोणची टिकविण्याची पद्धत, प्रिझर्वेशन ब्रॅंण्डिंग पॅकिंग, मार्केटिंग, व्यवसाय कसा सुरू करावा, आर्थिक गुंतवणूक, व्यवसायाचे अर्थशास्त्र आदींबाबत या विषयांतील जाणकार तसेच अनेक उद्योजक घडविणाऱ्या तज्ज्ञ सौ. गंधाली दिंडे मार्गदर्शन करतील. नोटस् व डिजिटल प्रमाणपत्रासह प्रति व्यक्ती तीन हजार रुपये शुल्क आहे.


चौकटीसाठी

या लोणच्यांचे होणार प्रात्यक्षिक ः
आंबा लोणचे, लिंबू लोणचे, कारले लोणचे, चिंच लोणचे, मिक्स लोणचे, लसूण लोणचे, लिंबू छुंदा मिरची लोणचे, आवळा लोणचे, ड्रायफ्रूट लोणचे, हळद लोणचे, कच्च्या पपईचे लोणचे.
प्रशिक्षणाचे ठिकाण ः सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रपटगृहाजवळ, कोल्हापूर.
आगाऊ नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ९१७५७२४३९९.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com