रक्तातील साखर संशोधन बातमी

रक्तातील साखर संशोधन बातमी

01116
डॉ. धनाजी मालवेकर
01117
डॉ. सी. डी. लोखंडे
1118
डॉ. सतीश जाधव
01121
डॉ. पी. एन. पावसकर


रक्तातील साखरेचे प्रमाण
शोधण्याचे ‘डी. वाय.’ला पेटंट

कोल्हापूर, ता. ६ ः मानवी शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण शोधण्याच्या पद्धतीसाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला पेटंट जाहीर झाले. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी संशोधित केलेल्या ‘मेथड ऑफ सिंथेसायझिंग निकेल टंगस्टेन ऑक्साईड फिल्मस् फॉर ग्लुकोज सेन्सिंग एप्लीकेशन’ या कंपाउंड तयार करण्याच्या पद्धतीसाठी हे पेटंट मिळाले. विद्यापीठाला मिळालेले हे १९ वे भारतीय पेटंट आहे.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधनप्रमुख प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. पी. एन. पावसकर, डॉ. धनाजी मालवेकर आणि डॉ. सतीश जाधव यांनी हे संशोधन केले आहे. संशोधकांनी तयार केलेले कंपाउंड पातळ फितींच्या स्वरूपात असून त्यासाठी साध्या रासायनिक पद्धतीचा वापर केला आहे. या कंपाउंडचा वापर विद्युत रासायनिक उपकरणात करून रक्तातील साखरेचे प्रमाण अचूकपणे मोजता येईल. या पद्धतीने साखरचे निदान करताना खर्चातही बचत होईल. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्‍वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्‍वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com