गोवा चंदेरी महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवा चंदेरी महोत्सव
गोवा चंदेरी महोत्सव

गोवा चंदेरी महोत्सव

sakal_logo
By

01120
कोल्हापूर ः गोवा चंदेरी महोत्सवाला शनिवारी रंकाळा पदपथ उद्यान येथे प्रारंभ झाला.

गोवा चंदेरी महोत्सवाला प्रारंभ
कोल्हापूर, ता. ६ ः येथील रंकाळा पदपथ उद्यानात आजपासून गोवा चंदेरी महोत्सवाला प्रारंभ झाला. माजी महापौर सई खराडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन झाले. गोवा आणि महाराष्ट्राचे अतूट नाते असून अशा महोत्सवातून ते आणखी घट्ट होते, असे यावेळी त्यांनी सांगितले.
भाऊसाहेब बांदोडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महोत्सवाला प्रारंभ झाला. रोटरी क्लबचे अध्यक्ष अशोक नाईक, संस्थेचे अध्यक्ष मोर्तू नाईक यांनी स्वागत केले. ‘रंगमेळ'' या गोव्यातील संस्थेच्या कलाकारांनी गोव्यातील संस्कृतीवर आधारित विविध गीते व नृत्ये सादर केली. महिला विभाग प्रमुख आनंदी नाईक, बंटी मुडेलकर, नवीन खांडेकर आदी उपस्थित होते. उद्या (रविवारी) ‘गझलरंग'' हा कार्यक्रम सादर होणार आहे.