
गडहिंग्लजला हालसिद्धेश्वर, भागुबाई देवीची गुरुवारी यात्रा
गडहिंग्लजला हालसिद्धेश्वर,
भागुबाई देवीची गुरुवारी यात्रा
गडहिंग्लज, ता. ७ : वडरगे रोडवरील श्री हालसिद्धेश्वर व भागुबाई देवीची यात्रा गुरुवारी (ता. ११) होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी सातला सुनिल मोहिते, विनोद चव्हाण, मारुती मांगले यांच्याहस्ते देवास अभिषेक होईल. आठला सरीता मोहिते, सुप्रिया मोहिते यांच्याहस्ते भागुबाई देवीची ओटी भरले जाईल. सायंकाळी सहाला प्रशांत मोहिते व विठ्ठल मधोळे यांच्याहस्ते पालखी पूजन आहे. नारायण मोहिते यांच्या घरातून पालखी मिरवणूक सुरु होईल. रात्री आठला हालसिद्धेश्वर मंदिराजवळ पालखी येणार आहे. रात्री आठला विजय मोहिते, जयश्री मोहिते यांच्याहस्ते महाप्रसादाचे वाटप होईल. रात्री हरी भजनाचा र्काक्रम आहे. शिवाजी मोहिते, संभाजी मोहिते, प्रविण मोहिते, शशिकांत मोहिते, राहूल मोहिते, आप्पासाहेब बस्ताडे, समीर मुल्ला, अॅड. कुरणगे, सुहास जगताप, सचिन मोहिते, विनोद चव्हाण यांनी नियोजन केले आहे.