जांभूळवाडीत संयुक्त जयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांभूळवाडीत संयुक्त जयंती उत्साहात
जांभूळवाडीत संयुक्त जयंती उत्साहात

जांभूळवाडीत संयुक्त जयंती उत्साहात

sakal_logo
By

जांभूळवाडीत संयुक्त जयंती उत्साहात
गडहिंग्लज, ता. ७ : जांभूळवाडी (ता. गडहिंग्लज) येथील वीर जवान रविराज सामाजिक सेवा मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व भगवान गौतम बुद्ध या महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. व्ही. डी. कांबळे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहन झाले. धम्म प्रचारक एस. आर. कांबळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. या वेळी लष्कारातून सेवानिवृत्त होवून पोलिस दलात नियुक्त झालेले युवराज कांबळे यांचा व्ही. डी. कांबळे यांच्याहस्ते सत्कार झाला. बालवाडी ते महाविद्यालयीन विद्यार्थीनीना शालोपयोगी साहित्याचे वाटप झाले. मुलामुलींसाठी विविध स्पर्धा झाल्या. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत गीत गायनावर नृत्य स्पर्धा झाल्या. केशव कांबळे, पिराजी कांबळे, तानाजी कांबळे, पुंडलिक कांबळे, यलाप्पा कांबळे, संजय कांबळे, शिवराम कांबळे, धोंडीबा कांबळे, ओमकार कांबळे, विलास कांबळे आदींनी नियोजन केले होते. एस. आर. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक कार्यक्रमावर होणारा खर्चाची बचत करुन ती रक्कम शेंद्री येथे होणार्‍या महाबुद्ध विहारसाठी देणगी देण्यात आली.