गड-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-संक्षिप्त
गड-संक्षिप्त

गड-संक्षिप्त

sakal_logo
By

01186
गडहिंग्लज : शिंदे हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात माजी विद्यार्थिनींतर्फे एस. एन. खोराटे यांचा सत्कार करण्यात आला.

शिंदे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थिनींचा मेळावा
गडहिंग्लज : येथील वि. दि. शिंदे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थिनींचा मेळावा झाला. सन १९६१ ते २००३ या कालावधीतील माजी विद्यार्थिनी या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्या होत्या. माजी मुख्याध्यापक एस. एन. खोराटे अध्यक्षस्थानी होते. माजी मुख्याध्यापिका यु. एस. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी विद्यार्थिनींतर्फे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला. अरुणा शिंदे, रेखा पोतदार, रुपाली देवार्डे, शैलजा मस्कर या माजी विद्यार्थिनींची भाषणे झाली. शिक्षकांनी केलेले संस्कार व ज्ञानदानाच्या कार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. ए. जे. हराडे यांनी सूत्रसंचालन केले.
----------------------
शिप्पूर शाळेचे ‘एनएमएमएस’मध्ये यश
गडहिंग्लज : शिप्पूर तर्फ आजरा (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत यश मिळविले. निवेदिता सागर, रूपाली सावंत, दिक्षा राशिवडे, रजनी पाटील, हर्षदा गुरव या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरल्या. त्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांप्रमाणे पाच वर्षांसाठी ६० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तर समिक्षा नरवडकर, श्रेया कोकितकर, गणेश गुंडप, समिक्षा केसरकर, धीरज सागर हे विद्यार्थी सारथीच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना पद्मश्री गुरव यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रकाश पन्हाळकर, मुख्याध्यापक शामराव माळकरी, शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले.
-----------------
महागावला बुद्ध जयंतीनिमित्त कार्यक्रम
गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील भीमनगरमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. बौद्ध धम्म प्रचारक जीनचित बौद्धाचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. बौद्धाचार्य म्हणाले, ‘‘बौद्ध धम्म मानवाला दु:खातून मुक्त करतो. दान पारमिता ही धम्मात विशेष महत्वाची आहे. दान देताना देणाऱ्या व्यक्तीने नि:स्वार्थी बुद्धीने दान करावे.’’ डॉ. जयकुमार सरतापे यांचेही भाषण झाले. उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अक्षता कुपटे हिचा सत्कार झाला. डॉ. एम. एस. कांबळे, प्रदीप कांबळे, प्रकाश तिळवले, भीमराव कांबळे, बसवंत तेली, रमेश कांबळे, जयसिंग कांबळे, विशाल परवाल, विश्‍वसाई रेवडकर, विलास रेवडकर, सखाराम भोसले आदी उपस्थित होते. डॉ. बाळासाहेब सरतापे, स्वाती सरतापे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
------------------
ओंकारच्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालय व आजरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे आण्णाभाऊ आजरा सुतगिरणीच्या गारमेंट विभागाला भेट दिली. अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी उद्योगाचे धडे गिरविले. सुपरवायझर मनिष टोपले यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर, अशोक चराटी, प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण, प्राचार्य अशोक सादळे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. काशिनाथ तनंगे, डॉ. ज्ञानराजा चिघळीकर, डॉ. संजय चव्हाण, डॉ. महेंद्र जाधव यांनी भेटीचे नियोजन केले.
----------------------
जागृती प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : येथील जागृती प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी श्रेया इंटिलिजंट्स अकॅडमीतर्फे घेतलेल्या परीक्षेत यश मिळविले. शाळेचा १०० टक्के निकाल लागला. श्रीयांश माने, विघ्नेश नारे, वैभवी खाडे, कौस्तुभ होडगे, वैष्णवी कानडे, सई बोरवडकर, सई भादवणकर, तेजल तोडकर, ओम पाटील, आदिती गाडवी हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. एस. बी. बनसोडे, जे. एस. गुरव, एस. सी. गुरव यांचे मार्गदर्शन मिळाले. मुख्याध्यापिका श्रीमती एम. एस. आजरी यांचे प्रोत्साहन लाभले.