वाघबीळ घाटात चारचाकी पलटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघबीळ घाटात चारचाकी पलटली
वाघबीळ घाटात चारचाकी पलटली

वाघबीळ घाटात चारचाकी पलटली

sakal_logo
By

वाघबीळ घाटात चारचाकी उलटली

धारवाडचे चौघे जण जखमी


कोल्हापूर, ता. ७ ः पन्हाळा येथील वाघबीळ घाटात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चारचाकी उलटल्याने झालेल्या अपघातात चौघे जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इम्रान मुस्ताक सुंडके (वय ३९), महम्मदअली नुरअहमद बिजापूर (वय २२), इम्रान शरीफ बागवान (वय २४), शकीर मुन्ना कितुर (वय २६, सर्व रा. धारवाड) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारवाडचे चौघे जण विशाळगड येथे देव दर्शनासाठी गेले होते. आज पहाटे ते पन्हाळा मार्गे कोल्हापूरकडे येत होते. इम्रान सुंडके हा गाडी चालवत होता. पहाटे अंदाज चुकल्याने त्यांची गाडी घाटात उलटली. यामध्ये चौघेही जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.