
कमला कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण
01242
कमला कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण
कोल्हापूर ः कमला कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ झाला. उद्योजक अरूण गोयंका यांच्या हस्ते वितरण झाले. अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील होते. उद्योजक गोयंका म्हणाले, ‘शिक्षण व उद्योग व्यवसायाचा प्रसार, प्रचार व महिलांचा सहभाग यामुळे भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे.’ यावेळी आदर्श विद्यार्थिनी म्हणून आसमा कुरणे हिला गौरविण्यात आले. तर सामाजिक कार्यातील गुणवंत विद्यार्थिनी म्हणून राजलक्ष्मी कदम हिला सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी यांचे विचार स्वरूप आणि वास्तव या ग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी सुनीता गोयंका, संस्थेचे उपाध्यक्ष, डॉ. एस. एन. पवार, रोटरियन सुभाष मालू उपस्थित होते. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रा. डॉ. अनिल घस्ते यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी प्रकाशित ग्रंथाची माहिती दिली. सत्रसंचालन प्रा. डॉ. निता धुमाळ यांनी केले. प्रा. डॉ. प्रवीण चौगले यांनी आभार मानले.