अतिक्रमण कारवाई संथगतीने

अतिक्रमण कारवाई संथगतीने

बालिंगा येथील अतिक्रमणे हटवण्यात चालढकल

कोल्हापूर- गगनबावडा रस्ता काम : कारवाई होत नसल्याने कामही रेंगाळले

कोल्हापूर, ता. ७ : गगनबावडा, कोकण, गोवा येथील वाहतुकीमुळे गर्दी होणाऱ्या कोल्हापूर- गगनबावडा रस्त्याचे रुंदीकरण सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी कामेही जोमात सुरु आहेत. मात्र, बालिंगा (ता. करवीर) ओढा ते नागदेववाडीपर्यंत असणारी अनेक अतिक्रमणे अद्यापही पूर्ण क्षमतेने हटवलेली नसल्याने या ठिकाणी दरररोज गर्दी होताना दिसत आहे.
कोल्हापूर- गगनबावडा रस्ता रुंदीकरणामध्ये पहिल्या टप्प्यातील कामे पावसाळ्याआधी पूर्ण होणे गरजेचे आहे. फुलेवाडी भगवा चौक ते कळे (ता.पन्हाळा) दरम्यान असणाऱ्या रस्त्यावरील वृक्षतोड झाली आहे. तर काही ठिकाणी झाडे तोडण्याचे काम सुरु आहे. बालिंग्यासह इतर ठिकाणी असणाऱ्या ओढ्यांवरील पुलाच्या कामानेही गती घेतली आहे. मात्र, बालिंगा ते नागदेववाडी या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आता चालढकल होत असल्याचे चित्र आहे. हा रस्ता पूर्ण क्षमतेने रिकामा झाला नसल्याने दररोज या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत आहे. बालिंगा येथील रस्त्यावरील अतिक्रमण पूर्ण काढून त्या ठिकाणी वाहतुकीसाठी चांगला रस्ता करावा लागणार आहे. याकडे संबंधित अधिकारी किंवा ठेकेदाराने लक्ष दिलेले नाही. काही अतिक्रमणधारक आपले अतिक्रमण काढून घेण्यास चालढकल करत आहेत. अधिकाऱ्यांकडूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने या ठिकाणचे काम रेंगाळल्याचे चित्र आहे.
...

धुळीने माखतो रस्ता ...

दिवसभरात आणि रात्री हजारो वाहने या रस्त्यावरून वाहतूक करतात. बालिंगा येथे सुरु असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी पाणी मारलेले नसते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य असते. एक ते दोन मिनिटांचा हा रस्ता पार करताना धुळीतूनच वाट काढावी लागते. त्यामुळे या ठिकाणी पाणी मारणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com