
टोमेटो, कोथींबीर, लिंबू स्वस्त
01259/ 01260
कोल्हापूर : आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने लिंबू स्वस्त झाले, तर लालभडक टोमॅटोने लक्ष्मीपुरी मंडई भरून गेली आहे. (सर्व छायाचित्रे : अमोल सावंत)
लिंबू, टोमॅटो झाले स्वस्त
पडवळाची आवक कमी; भाजीपाल्याचे दर आवाक्यात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : अजूनही दुपारी असह्य उकाडा असतो. तरीही दहा रुपयाला दहा लिंबूंची विक्री सुरू आहे. काहीसे पिवळट, हिरव्या रंगांच्या लिंबूंची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. मार्च ते मेदरम्यान उन्हाळ्याच्या कालावधीत लिंबू काहीसा महाग असतो. मात्र, यावर्षी लिंबूंची आवकही सर्वाधिक झाली. उत्तर कर्नाटक, सांगली, सोलापूर, पुणे, नगर आदी भागातून लिंबूंची आवक होते. वर्षभर हा लिंबू मंडईत असतो. अंबे, मृग आणि हस्त हे लिंबू काढणीचे तीन हंगाम आहेत. जानेवारी ते फेब्रुवारी (आंबे हंगाम), जून आणि जुलै (मृग), सप्टेंबर ते ऑक्टोबर (हस्ता) कालावधीत फुले येतात. फळांची निर्मिती एप्रिल, ऑक्टोबर, मार्चच्या आसपास होते. गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओरिसा, महाराष्ट्र हे लिंबू उत्पादक राज्ये आहेत. द्राक्ष फळांप्रमाणे लिंबूचा सामान्यतः दोन कापणीच्या वेळा असतात. लिंबू हे कुठल्याही जमिनीत येतो. भरपूर उत्पन्न देणाऱ्या लिंबूच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत. अगदी परसदारी किंवा घरासमोरील बागेतही लिंबू लावता येतो. बारमाही उत्पन्न देणारे हे लिंबू आहेत.
दरम्यान, काही ठिकाणी पडवळही दिसू लागले आहे; तर लालभडक टोमॅटोचे दर पडले असून दहा रुपये किलो असा दर आज होता. अन्य फळभाज्यांचे दरही आवाक्यात आहेत.
चौकट
फळभाजीचे दर (प्रतिकिलो रुपये)
हेळवी लालरंगाचा कांदा *१०
बटाटा *२०
लिंबू *१० रुपयाला १० लिंबू
पडवळ *१० ते २० रुपयाला नग
दोडका *४०
हिरवा टोमॅटो *१०
लाल टोमॅटो *१०
कारली *४०
दुधी भोपळा १०/२० रुपये प्रतिनग
हिरवी मिरची *४०
काळा घेवडा *८०
रताळे *४०
हिरवी वांगी *४०
फ्लॉवर *२०
कोबी *५/१०
भेंडी *४०
जवारी गवारी *२० रुपये पावशेर
लाल बीट *१० रुपये एक नग
शेवगा *१० रुपयाला तीन पेंढ्या
ढब्बू मिरची *४०
वरणा *४०
वाल शेंग *४०
काटे काकडी *२०
आल्ले *४०
कच्ची केळी *४०/५० रुपये डझन
लाल भोपळा *४०
मक्का कणीस *१० रुपयाला एक नग
कर्नाटकी भाजीचा कोहळा *८०/१०० रुपये नग
सुरण गड्डा *८०
आळू गड्डा *८०
चौकट
पालेभाज्यांचे दर (प्रतिपेंढी)
मेथी *१०/१५
लाल माट *१०
तांदळी *१०
शेपू *१०
चाकवत *१०
कोथिंबीर *२०
कांदापात *१५
ाआंबाडा *१०
आंबट चुका *१०
पालक *१०
घोळीची भाजी *१० रुपयाला प्लेट
...
ठळक चौकट
सोने-चांदीचे दर (प्रतितोळा/प्रतिकिलो) (रविवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत घेतलेले दर)
सोने- ६२,७२५ प्रतितोळा
चांदी- ७७,७०० प्रतिकिलो
...
01281
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीत बाजारपेठेत लालसर रंगाच्या आंब्याची आवक वाढली आहे.
लाल रंगाच्या आंब्याची आवक
कोल्हापूर, ता. ७ : रायवळ प्रकारातील लाल आंब्याची आवक झाली असून, शंभर रुपयाला दीड किलो, दोन किलो अशी विक्री सुरू आहे. हा आंबा घेण्यासाठी लक्ष्मीपुरीत गर्दी दिसत होती. चवीला गोड अन् देठापाशी लाल, पिवळसर रंगांचे हे आंबे लालबागचा आंबा म्हणून ही प्रसिद्ध आहेत. रत्नागिरी हापूस कमी होत आला की, रायवळी आंबे येण्यास सुरुवात होतात. याबरोबर मालगोवा नावाचा प्रजातीचा एक आंबाही लक्ष्मीपुरीत विक्रीसाठी आला आहे. तोही चवीला गोड असून, आकाराने काहीसा मोठा आहे.