
‘गंगामाई’मध्ये क्रीडा गणवेश वाटप
01258
इचलकरंजी : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थीनींना क्रीडा गणेवशाचे वाटप श्रीनिवास बोहरा, किसन बोहरा यांच्या प्रमुख उपस्थीतीत करण्यात आले.
‘गंगामाई’मध्ये क्रीडा गणवेश वाटप
इचलकरंजी : शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या बोहरा यांचे कार्य सर्वांना अनुकरणीय आहे. विविध क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही, अशा शब्दात ना. बा. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किसन बोहरा यांनी भावना व्यक्त केल्या. येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज इचलकरंजीमध्ये मदनलाल बोहरा व गीताबाई बोहरा यांचा द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी संस्था प्रेसिडेंट निवास बोहरा होते. मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त अहमद मुजावर, एस. एस कोळी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रशालेतील राज्य व राष्ट्रीय खेळाडूंना बोहरा परिवारातर्फे क्रीडा गणवेश वाटप तसेच रोटरी क्लबने दिलेल्या सायकलींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मारुतराव निमकर, उप प्राचार्य आर. एस. पाटील, उपमुख्याध्यापिका एस. एस भस्मे, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, पर्यवेक्षक एस.व्ही. पाटील, शेखर शहा, व्ही. जी. पंतोजी उपस्थित होते. प्रा. एस.आर. काशीद यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. रानडे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.