अपघात टळला, पुन्हा काळजी घ्यावी

अपघात टळला, पुन्हा काळजी घ्यावी

अपघात टळला, पुन्हा काळजी घ्यावी
भिती दूर करण्याचे आवाहन; कंपनी करणार नागरिकांचे प्रबोधन
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ७ ः इचलकरंजी शहरात नॅचरल (नैसर्गिक) गॅस पुरवठा करण्याऱ्या‍ गॅसवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून शनिवारी गळती होऊन आग लागली. त्यावेळी तेथे उपस्थित नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण होते. आग आटोक्यात आणण्यात यश मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टाळता आला. मात्र गळती व आग लागली कशी हा प्रश्न उपस्थित होतो. कंपनीने दक्षता घेतली असतानाही आग लागली असल्याने नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहे. जाणकारांच्या मते व्हॉल्व्हसोबत छेडछाड केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरात नॅचरल (नैसर्गिक) गॅस पुरवठा करण्यासाठी पाईप लाइनचे जाळे विणले आहे. पाईपमधून पुरवठा होणाऱ्‍या गॅसवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित गॅस कंपनीने ५०० मीटरच्या अंतरावर चेंबर तयार करून व्हॉल्व्ह बसवले आहेत. शहरात विविध चौकांमधून सुमारे १५० हून आधिक व्हॉल्व्ह बसवले आहेत. पंचवटी चित्र मंदिर परिसरातील आगीची घटना घडलेल्या भागात सुमारे २० व्हॉल्व्ह आहेत. ते नवीन असून उत्तम दर्जाचे आहेत. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे शेजारी असणाऱ्‍या झाडाने पेट घेतली. तर लगतच उभी केलेली दुचाकी जळून खाक झाली होती.
-----------------
नॅचरल गॅसचा स्फोट होत नाही.
नॅचरल ( नैसर्गिक ) गॅस हा हवेत मिसळणारा असल्याने याचा स्फोट होण्याची शक्यता ९९ टक्के नसते. गॅसला वास नसल्याने गळती नागरिकांच्या लक्षात येण्यासाठी वास येण्याचे केमिकल मिसळण्यात येत आहे. गॅस लिकेज झाल्यास हा गॅस हवेत मिसळतो त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. तसेच कंपनीच्या सुरक्षा अधिकाऱ्‍यांकडून चौकाचौकात नॅचरल गॅसविषयी माहिती देण्यात येणार असल्याचे गॅस कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
---------------------------
गॅस कंपनी समोर आव्हान
नॅचरल गॅस पाईपलाइन शहरभर पसरलेली आहे. काही भागात गॅस पुरवठा सुरू आहे. काही भागात अद्याप गॅस पुरवठा सुरू केला नाही. मात्र शनिवारी घडलेल्या आगीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ती कमी करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com