‘संत गजानन’ केंद्रावर नीट परीक्षा सुरळीत

‘संत गजानन’ केंद्रावर नीट परीक्षा सुरळीत

gad77.jpg
01282
चिंचेवाडी : संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था पाहण्यासाठी विद्यार्थी, पालकांची गर्दी झाली होती.
-------------------------------------------------------
‘संत गजानन’ केंद्रावर
नीट परीक्षा सुरळीत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एन.टी.ए.) झालेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) सुरळीत झाली. महाराष्ट्रात सर्वाधिक परीक्षार्थी असलेल्या या केंद्रावर १२४८ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली होती. त्यापैकी १२३० विद्यार्थी परीक्षेला बसले.
दुपारी २ ते सायंकाळी ५.२० या वेळेत ही परीक्षा झाली. या केंद्रावरील मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी अकरापासूनच नाव नोंदणी व तपासणी करूनच विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश दिला जात होता. प्रत्यक्षात परीक्षा दोन वाजता असली तरी विद्यार्थी व पालक सकाळी नऊ पासूनच केंद्रावर हजेरी लावत होते. परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात होता. गर्दीच्या पार्श्वभूमीवर वान पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केली होती. परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली १५० हून अधिक कर्मचाऱ्‍यांची नियुक्ती केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com