रेंदाळचा श्रीराज भोसले प्रथम

रेंदाळचा श्रीराज भोसले प्रथम

ich75.jpg
01283
इचलकरंजी ः देशभक्त बाबासाहेब खंजीरे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त बुध्दीबळ स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षिस वितरण झाले.
-------
रेंदाळचा श्रीराज भोसले प्रथम
इचलकरंजीत बुद्धीबळ स्पर्धा; बाबासाहेब खंजीरे जन्मशताब्दीनिमित्त आयोजन
इचलकरंजी, ता. ७ ः देशभक्त बाबासाहेब खंजीरे जन्मशताब्दी निमित्त येथे बुद्धिबळ स्पर्धा झाली. स्पर्धा कोल्हापूर जिल्हा मर्यादित व खुल्या अशा दोन विभागात घेतल्या. स्पर्धेत सर्व लढती अत्यंत रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक पद्धतीने खेळल्या गेल्या. खुल्या विभागामध्ये रेंदाळ येथील श्रीराज भोसले प्रथम क्रमांकाची मानकरी ठरला. त्याला ८ हजार रोख व ट्रॉफी दिली.
येथील युनिक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे स्पर्धा झाल्या. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई तसेच कर्नाटक व राजस्थानमधील खेळाडुंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत एकुण ५२७ स्पर्धक सहभागी झाले होते. खुल्या गटात सातारामधील अनिकेत बापट व ओंकार कडव यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. त्यांना अनुक्रमे ६ हजार व ४ हजार रुपये व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा पातळीवर जयसिंगपूर येथील दिव्या पाटील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. तिला पाच हजार रुपये व ट्रॉफी दिली. कोल्हापूरमधील आदित्य सावळकर व रेंदाळ येथील श्रीराज भोसले यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. त्यांना अनुक्रमे ३ हजार व २ हजार आणि ट्रॉफी देवून गौरवले. स्पर्धेत एकूण ७० हजारांची रोख बक्षिसे दिली.
सन्मती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल पाटील, पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, इंडस्ट्रीयल इस्टेटचे संचालक महादेव कांबळे, राजू बिद्रे, राजू बोरगावे, विजय पाटील या मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले. कार्याध्यक्ष राहुल खंजिरे यांनी जन्मशताब्दीनिमित्त आयोजित होणाऱ्या स्पर्धांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रमोद खुडे यांनी केले. आभार अध्यक्ष रविराज पाटील यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोहित पोळ, भरत चौगुले, करण परीट, विजय सलगर यांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com