बहुजन ऐक्य चळवळीतर्फे मेळावा

बहुजन ऐक्य चळवळीतर्फे मेळावा

01298
...
प्रसंगी नेत्यांना गावबंदी-जिल्हा बंदी करू

बहुजन ऐक्य चळवळीचे आंबेडकरी पक्ष संघटनांना ऐक्याचे आवाहन

कोल्हापूर, ता. ७ : विविध आंबेडकरी पक्ष संघटनांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र न आल्यास आणि त्यांची भूमिका १४ ऑक्टोबरपर्यंत जाहीर न केल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. प्रसंगी नेत्यांना गावबंदी-जिल्हा बंदी करू, अशा प्रकारचा ठराव बहुजन ऐक्य चळवळीतर्फे आयोजित जनआंदोलन परिषदेत संमत करण्यात आला. ठरावाचे सूचक दिलीप कांबळे तर अनुमोदक म्हणून सुरेश कांबळे यांनी पाठिंबा दिला.

विविध आंबेडकरी पक्ष संघटनांनी किमान समान कार्यक्रमावरती एकत्र येऊन २०२४ ची निवडणूक एकत्रित लढावी, यासाठी बहुजन ऐक्य चळवळीतर्फे शाहू स्मारक भवनामध्ये जनआंदोलन परिषदेचे आयोजन केले होते. नव्या शोषण व्यवस्थेची उतरंड महिलांच्या हस्ते फोडून परिषदेचे उद्‌घाटन झाले. दरम्यान, बहुजन ऐक्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांच्या ‘ॲट्रॉसिटी आणि आरक्षण’, ‘भीमा कोरेगाव १८१८ आणि २०१८’ पुस्तकांच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना अनंत मांडूकलीकर म्हणाले, ‘डॉ. आंबेडकरांनी ‘एक व्यक्ती, एक मत’ ही संकल्पना मांडली. त्या संकल्पनेच्या आधारावर अनेक प्रस्थापित पक्ष निवडून गेले; परंतु आंबेडकरी पक्ष संघटना विविध गटांत असल्याने सत्तेपासून दूर राहिली.’ बौद्ध प्रणालीचे अध्यक्ष सुशीलकुमार कोल्हटकर म्हणाले, ‘अनुयायांनी बाबासाहेबांनी दिलेला कृती आराखडा हा राजकारणात न वापरल्यामुळे आंबेडकरी राजकारणाची पीछेहाट झाली.’ साहिल कबीर यांनी बहुजनांची व्याख्या ही व्यापक आहे; परंतु ‘कम्युनिटीनी’ प्रत्येक विचारधारा बंदिस्त करून टाकल्याचे सांगितले. कामगार चळवळीतले कार्यकर्ते संभाजी कांबळे यांनी भीमा कोरेगावच्या लढ्यातून जसे ऐक्य दिसले, तसे ते बहुजन आंबेडकरी पक्ष संघटनांमध्ये राजकारणाच्या माध्यमातून दिसायला हवे, असे सांगितले.

परिषदेत विविध सामाजिक संघटनांचा त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सत्कार झाला. सुरेश पाडळीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कांबळे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com