शहरातील गुन्हेगारी वृत्त

शहरातील गुन्हेगारी वृत्त

टिंबर मार्केटमध्ये तरुणास मारहाण

कोल्हापूर ः करण सुनील सोनुले (वय २८, रा. जिवबा नाना चौक) यांना चौघांनी मारहाण केली. शुक्रवारी (ता.५) रात्री आठ वाजता टिंबर मार्केटमधील लोळगे वखारीसमोर हा प्रकार घडला. या प्रकरणाची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी ओंकार आवळे (रा. संभाजीनगर), मोहन मदाळे (रा. टिंबर मार्केट), समीर शेख आणि जावेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. करणवर धारदार शस्त्रांनी वार केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
------

शहरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले

कोल्हापूर, ता. ७ ः शहरात मध्यवर्ती बसस्थानक, गंगावेश आणि मोहिते कॉलनी या ठिकाणी उभ्या केलेल्या दुचाकी चोरीला गेल्या. या घटनांची नोंद विविध पोलिस ठाण्यात झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय दशरथ मोरे (वय ३५, रा. सुधाकर जोशीनगर, कोल्हापूर) यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका पान शॉपसमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली. हा प्रकार गुरुवारी (ता. ४) रात्री साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान घडला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. विजय बाबूराव पाटील (वय ४२, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांची दुचाकी मोहिते कॉलनी येथील बाबा नेसरीकर हॉल येथून अज्ञाताने चोरली. ही घटना ३० एप्रिलला दुपारी बारा ते दीडच्या दरम्यान घडली. याबाबत त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तर भागोजी रामचंद्र आडूळकर (वय ३५, रा. बोंद्रेनगर, कोल्हापूर) यांची गंगावेश येथील विजय बेकरीसमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्याने गुरुवारी (ता. ४) सकाळी आठ ते सव्वाआठच्या दरम्यान चोरली. याबाबत त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com