ग्रंथालयांचे संगणकीकरण व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रंथालयांचे संगणकीकरण व्हावे
ग्रंथालयांचे संगणकीकरण व्हावे

ग्रंथालयांचे संगणकीकरण व्हावे

sakal_logo
By

gad81.jpg
01339
गडहिंग्लज : सार्वजनिक ग्रंथालयांच्या शिबिरात अपर्णा वाईकर यांचा सत्कार करताना स्वरूप खारगे. याप्रसंगी दत्ता देशपांडे, सदाशिव शिंदे उपस्थित होते.
---------------------------
ग्रंथालयांचे संगणकीकरण व्हावे
स्वरूप खारगे; सार्वजनिक ग्रंथालयांचे एकदिवसीय शिबीर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. अशा परिस्थितीत पारंपरिक पद्धतीने ग्रंथालयांची वाटचाल योग्य नाही. ग्रंथालयांचे कामकाजही अद्ययावत व्हावे यासाठी ग्रंथालयांनी संगणकीकरणाला प्राधान्य देऊन आपल्या कामात तत्परता आणावी, अशी अपेक्षा मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी व्यक्त केली.
येथील पालिकेच्या साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयात अक्षांश-रेखांश व इतर माहिती अद्ययावत करण्यासाठी तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे एक दिवसीय शिबीर झाले. याच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती वाईकर यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करून सर्वच ग्रंथालय अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत ग्रंथालयांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. ग्रंथालय निरीक्षक सदाशिव शिंदे, प्रकाश इंगळे, नारायण सुतार, बाळासाहेब मोर्ती, श्रीपाद स्वामी, के. डी. धनवडे, सचिन ओहरा, शिवाजी मांगले, सुभाष खोत, एस. बी. पाटील आदी उपस्थित होते. दत्ता देशपांडे यांनी स्वागत केले. राजेंद्र भुइंबर यांनी आभार मानले.