सर्वसामान्य माणूस भितीच्या छायेखाली

सर्वसामान्य माणूस भितीच्या छायेखाली

ich81.jpg
01363
इचलकरंजी ः समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात `निर्भय बनो` कार्यक्रमात डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रसाद कुलकर्णी, प्रताप होगाडे उपस्थीत होते.
---------------------------
सर्वसामान्य माणूस भितीच्या छायेखाली
डॉ. विश्वंभर चौधरी; इचलकरंजीत समाजवादी प्रबोधिनीमध्ये बैठक
इचलकरंजी, ता. ८ ः जनतेचे मूलभूत जीवन मरणाचे प्रश्न तीव्र होत असताना सत्ताधारी बहुसंख्यांकवादाच्या भ्रामक खेळात सर्वसामान्य जनतेला गुंतवून टाकत आहेत. त्यातून संविधानिक मूल्यांची मोडतोड केली जात असून सर्वसामान्य माणूस एका भीतीच्या छायेखाली वावरत आहे. पण या हुकूमशाहीविरोधात एक वर्ग अंडर करंट काम करतो आहे. तो संघटित केला पाहिजे. त्याद्वारे नागरिकांपासून शासन आणि प्रशासनातील सगळ्यांनाच निर्भय करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केले.
येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये ''निर्भय बनो'' या अभियानाच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रताप होगाडे होते. डॉ. चौधरी म्हणाले, ‘आज देशात अघोषित आणिबाणी आहे. स्वतंत्र विचार करणाऱ्या लोकांवर बंधने लादली जात आहेत. देशात एकच पक्ष आणि एकच नेता असे बिंबवण्याची हुकूमशाही सदृश वाटचाल सुरू आहे. विकासाचे गुलाबी चित्र मांडलं जातं आहे. पण दुसरीकडे बेरोजगारी वाढत आहे. इंधनाचे भाव गगनाला भिडल्यामुळे महागाई दररोज वाढतच आहे. आज नागरिकांचा आवाज दडपला जात आहे. आंदोलने संपवली जात आहेत. अशा परिस्थितीत नागरिक म्हणून आपण हातावर हात देऊन बसलो तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.’
होगाडे म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांच्या संविधानविरोधी वर्तन व्यवहाराविरुद्ध एक व्यापक भूमिका घेऊन सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन छेडण्याची गरज आहे. निर्भय बनो आंदोलनामुळे अनेक दाबले गेलेले आणि दबलेले आवाज आपल्यात सामील होतील. हे आंदोलन अधिक गतिशील करण्यासाठी आपण सर्वजण सहभागी होऊया. त्याचे लोक चळवळीत रूपांतर करूया. यासाठीचा व्यापक मेळा इचलकरंजीमध्ये लवकरच घेण्यात येईल.’
प्रा. अशोक कांबळे, सुनील बारवाडे, इस्माईल समडोळे, डॉ. रवींद्र कोठारी, भाऊसाहेब कसबे, जीवन कोळी, बाबासाहेब कवठेकर, पुरंदर पाटील, प्रकाश खांडेकर, स्वानंद कुलकर्णी, राजन मुठाणे, पवनकुमार चौगुले, तुकाराम अपराध, राहुल खरे, डॉ.संजय पुजारी यांनी चर्चेत सहभाग घेतला. सद्यस्थितीत अशा प्रकारच्या `निर्भय बनो` मंचाची गरज व्यक्त केली. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून या बैठकी मागील भूमिका स्पष्ट केली. जयकुमार कोले यांनी पाहुण्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. प्रारंभी ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते अरुण गांधी यांना आदरांजली वाढण्यात आली. बैठकीचे आयोजन परिसरातील सर्व संविधानवादी राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांच्यावतीने आणि समाजवादी प्रबोधिनीच्या पुढाकाराने केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com