
सुप्रिया मजगी हिचा सत्कार
gad84.jpg
01385
गडहिंग्लज : पायोनियर कॉम्प्युटर्सतर्फे अर्जुन हराडे यांच्या हस्ते सुप्रिया मजगी हिचा सत्कार झाला. याप्रसंगी शिवाजी चव्हाण उपस्थित होते.
सुप्रिया मजगी हिचा सत्कार
गडहिंग्लज : येथील पायोनियर कॉम्प्युटर्सतर्फे सुप्रिया मजगी हिचा सत्कार केला. सुप्रिया दहावीमध्ये शिकत आहे. शालेय वयातच ती कविता करते. तिच्या कवितांचा जिज्ञासा नावाचा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. याबद्दल अर्जुन हराडे यांच्या हस्ते सत्कार झाला. शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले.
------------------------------
पार्वती हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील पार्वती हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. यानिमित्त १८ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र आले. मुख्याध्यापक श्रीरंग तांबे अध्यक्षस्थानी होते. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला टीव्ही संच भेट दिला. शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांतर्फे सत्कार केला. शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. माजी विद्यार्थी विजय डवरी, प्रवीण नलवडे, आदेश पाटील, सागर सावंत, ममता कांबळे, सरिता सावंत, वैशाली शिंदे, प्रेमा हिरेमठ, रेश्मा मोरे आदी उपस्थित होते. बाबासाहेब कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. किशोर औरनाळकर यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता काटकर यांनी आभार मानले.