मुगळी येथे जलजीवन पाणी योजनेचे भूमिपूजन

मुगळी येथे जलजीवन पाणी योजनेचे भूमिपूजन

gad88.jpg
01427
मुगळी : श्री गुरुसिद्धेश्‍वर महास्वामींच्या हस्ते पाणी योजनेच्या कामाचा प्रारंभ झाला. यावेळी सोमगोंडा आरबोळे, संतोष भोसले, बसवराज धनवडे आदी उपस्थित होते.
---------------------------------------------------------
जलजीवन पाणी योजनेचे भूमिपूजन
नूल, ता. ८ : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे सुधारीत ९५ लाखाच्या जलजीवन पाणी योजनेच्या कामाचे भूमीपूजन नूल येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती गुरुसिद्धेश्वर स्वामी यांच्याहस्ते झाले. हिरा शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवीन योजनेत २५ हजार लिटर क्षमतेची टाकी, पाईपलाईन, शुध्दीकरण व सोलर यंत्रणेचा समावेश आहे. गुरूसिद्धेश्वर स्वामी, सोमगोंडा आरबोळे यांचे भाषण झाले. बसवराज धनवडे, चंद्रकांत माने, दुंडाप्पा पाटील, वसंत घोटणे, शोभा भोसले, महानंदा कटकोळे, संपदा पाटील, वर्षा घोटणे, बसापा आरबोळे, निंगापा माने, आपासो पाटील (हळमणी), अर्जुन जाधव, ईश्वर हुल्लोळी, मल्लाप्पा चौगुले, पुंडलिक आरबोळे, भीमा आरबोळे, सुनील वाघ आदी उपस्थित होते. विवेकानंद स्वामी यांनी स्वागत केले. आप्पासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक केले. संतोष भोसले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com