मल्टीपार्टी वीज कनेक्शन लोड कमी करा

मल्टीपार्टी वीज कनेक्शन लोड कमी करा

ich84.jpg
01474
इचलकरंजी ः महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना पॉवरलूम असोसिएशनतर्फे निवेदन देण्यात आले.
----------
मल्टिपार्टी वीज कनेक्शन लोड कमी करा
इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनतर्फे मागणी; अधिकाऱ्यांशी चर्चा
इचलकरंजी, ता. ८ ः शहरातील २७ एचपीवरील वीज ग्राहकांचा वीज वापर कमी झाला आहे. त्यामुळे मल्टिपार्टी वीज कनेक्शन असलेल्या संबंधित ग्राहकांचा लोड कमी करून द्यावा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनतर्फे महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना देण्यात आले. अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली.
सध्या महावितरणकडून जादा सिक्युरिटी डिपॉझिटच्या मागणीची बिले वितरीत केली आहेत. त्याऐवजी वीज ग्राहकांना मागणीनुसार प्रिपेड मीटर बसवून द्यावेत, अथवा प्रिपेड मीटर उपलब्ध नसल्यास त्यांच्याकडून बिलाची रक्कम आगाऊ भरून घेऊन पाच टक्के रिबीट द्यावा, असा वीज नियामक आयोगाने आदेश दिलेला आहे. याची अंमलबजावणी करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
इचलकरंजी व परिक्षेत्रामधील सर्व उपकेंद्रांमध्ये नवीन वीज जोडणी क्षमता संपत आलेली आहे. त्यामुळे नवीन सबस्टेशन निर्मिती व क्षमता वाढवण्यासाठी नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवण्याचा निर्णय झाला होता; पण त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही. देखभाल दुरुस्तीसाठी अतिरिक्त २६ कर्मचारी नेमणूक करणे व लॅडर व्हेईकल उपलब्ध करून देण्याबाबत कोल्हापूर मुख्य अभियंत्यांशी चर्चा झाली होती. त्याचीही अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. याचा पाठपुरावा करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात उपाध्यक्ष रफिक खानापुरे, संचालक पांडुरंग सोलगे, दत्तात्रय टेके, राजाराम गिरी, किरण पोवार यांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com