राजाराम निवड

राजाराम निवड

अध्यक्षपदी अमल महाडिक शक्य

‘राजाराम’ ची निवड आज ः उपाध्यक्षपदावर बावड्यातील उलपेंना संधी

कोल्हापूर, ता. ८ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड उद्या (ता. ९) होत आहे. सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संचालकांच्या पहिल्याच बैठकीत या निवडी होतील.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी माजी आमदार अमल महाडिक यांची निवड निश्‍चित समजली जात आहे. उपाध्यक्षपद कसबा बावड्याला देऊन या पदावर गेली पंधरा वर्षे संचालक असलेल्या दिलीप उलपे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
माजी आमदार महादेवराव महाडिक व काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ‘राजाराम’ च्या निवडणुकीत संचालक पदाच्या सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून श्री. महाडिक यांनी सत्तेची ‘डब्बल हॅटट्रीक’ पूर्ण केली आहे. एकहाती सत्ता मिळवताना निवडणूक प्रचारात कारखान्याचे विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प उभारण्याचे आश्‍वासन सत्तारूढ गटाने दिले आहे. ही कामे पूर्ण करायची झाल्यास शासन दरबारी पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. हा विचार डोळ्यापुढे ठेवून अध्यक्षपदावर अमल यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या पदावर अन्य कोणाला संधी द्यायची झाल्यास महादेवराव महाडिक, श्री. उलपे, मावळते अध्यक्ष दिलीप पाटील वगळता अन्य १३ संचालक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. लाटवडेचे शिवाजी पाटील यांचे पुनरागमन झाले असले तरी त्यांच्याकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता नाही. स्वतः श्री. महाडिक, दिलीप पाटील यांनी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. या सर्व बाबींचा विचार करता शेवटच्या क्षणी अमल यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
कारखान्याच्या गत निवडणुकीपेक्षा यावेळच्या निवडणुकीत बावड्यातून तुलनेने जास्त मतदान झाले आहे. त्याचा विचार करता उपाध्यक्षपद बावडा परिसराला दिले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास दिलीप उलपे यांना या पदावर संधी शक्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com