पाणीपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीपुरवठा बंद
पाणीपुरवठा बंद

पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By

व्हॉल्वदुरुस्तीसाठी शहरातील
काही भागात पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर, ता. ८ : चंबुखडी टाकीवरून येणाऱ्या मुख्य गुरुत्व वाहिनीवरील व्हॉल्व दुरुस्तीचे काम बुधवारी (ता. १०) होती घेण्यात येणार आहे. त्यावरील पाणीपुरवठा पूर्ण बंद होणार असल्याने शहरातील पाचही वॉर्डमधील निवडक भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सी, डी वॉर्डला सर्वाधिक फटका बसणार आहे.
बालिंगा जल उपसाकेंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागातील पाणी बंद राहील. तसेच गुरुवारी (ता. ११) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. ए, बी, वॉर्डमधील लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर टाकी परिसर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, शिवाजी पेठ, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठेतील काही भाग, संपूर्ण सी, डी वॉर्ड, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज, ई वॉर्डमधील शाहूपुरी पाचवी ते आठवी गल्ली, कुंभार गल्ली, बागल चौक येथील पाणी बंद राहणार आहे. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.