पत्रके आणि एज्युकेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रके आणि एज्युकेशन
पत्रके आणि एज्युकेशन

पत्रके आणि एज्युकेशन

sakal_logo
By

राजर्षी शाहू महाराज समाज मन
जोडणारा राजे : प्रा. सायरा मुलाणी
कोल्हापूर : ‘ राजर्षी शाहू महाराज म्हणजे समाजमन जोडणारा न्यायप्रिय राजा होता. समाज जीवन बदलण्यासाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. जात-धर्माचा विचार न करता उपेक्षित घटकांसाठी आरक्षण दिले. बहुजन समाजाच्या हितासाठी त्यांनी आपले जीवन व्यतीत केले,’’ असे प्रा. मुलाणी यांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षतर्फे आयोजित लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती सांगता व कृतज्ञता सोहळा झाला. ‘राजर्षी शाहू : जीवन व कार्य’ यावर कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांनी मार्गदर्शन केले.सायन्स विभागाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार अध्यक्षस्थानी होते. डॉ. किल्लेदार म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराज जर समजावून घ्यायचे असतील तर त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत. ’कला व वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. एस. जे. आवळे उपस्थित होत्या. डॉ. करीम मुल्ला यांनी स्वागत केले. सविता माजगावकर यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. जी. एम. लवंगारे यांनी आभार मानले. ...

न्यू कॉलेजमध्ये कार्यक्रम
कोल्हापूर : ‘‘कृषी, साहित्य, संगीत, कला, क्रीडा, उद्योग, सत्यशोधन अशा क्षेत्रांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जे कार्य केले त्याला तोड नाही. जीवनाच्या प्रगतीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे’, असे प्रा. मधुकर पाटील यांनी सांगितले. न्यू कॉलेज येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी सोहळा कृतज्ञता पर्व सांगता समारंभ उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यान झाले. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. ए. एम. शेख यांनी स्वागत केले. प्रा. आर. के. पाटील यांनी परिचय करून दिला. ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस. एन. इनामदार यांनी आभार मानले. प्रा. जे. बी. दिंडे यांनी सूत्रसंचालन केले. प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
...