सहसंचालक कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहसंचालक कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणार
सहसंचालक कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणार

सहसंचालक कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणार

sakal_logo
By

01544
......

‘उच्च शिक्षण’ मधील प्रलंबित
प्रकरणांचा निपटारा करणार

डॉ. हेमंत कठरेः पदभार स्वीकारला

कोल्हापूर, ता. ८ ः राजाराम महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. हेमंत कठरे यांनी सोमवारी कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी दीड वर्षे या पदावर काम केले आहे. कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेवून त्यांचा लवकरात लवकर निपटारा केला जाईल, असे त्यांनी पदभार स्वीकारताना सांगितले.
प्राध्यापक निवड प्रक्रियेवर योग्य पर्यवेक्षकीय नियंत्रण नसल्याचा आक्षेप उच्च शिक्षणाचे कोल्हापूर विभागीय सहसंचालक डॉ. राजेसाहेब मारडकर यांच्याबाबत शासन नियुक्त चौकशी समितीने नोंदविला. त्यावर शासनाने डॉ. मारडकर यांची नागपूर येथील त्यांच्या मूळ विभागातील वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेतील सहयोगी प्राध्यापक पदावर बदली केली. या सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. कठरे यांच्याकडे सोपविला. त्यांनी सोमवारी डॉ. मारडकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. नोव्हेंबर २०११ च्या शासननिर्णयानुसार सुरू असणारी सहायक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया अधिक गतीने पार पाडण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे डॉ. कठरे यांनी यावेळी सांगितले.