बालगोपाल चा मुख्य फेरीत प्रवेश

बालगोपाल चा मुख्य फेरीत प्रवेश

०१५३३
कोल्हापूर : शाहू छत्रपती गोल्ड चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस क्लबचा गोलरक्षक याने बालगोपालच्या खेळाडूंची चढाई अशाप्रकारे रोखली. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

बालगोपालचा मुख्य फेरीत प्रवेश 
कोल्हापूर, ता. ८ : शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज बालगोपाल तालीम मंडळ संघाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लब संघावर ३ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवत स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे. 
बालगोपाल विरुद्ध प्रॅक्टिस क्लब यांच्यातील सामना पूर्वार्धात तुल्यबळ वाटत असतानाच उत्तरार्धात मात्र संपूर्ण चित्र पालटले. आक्रमक सुरुवात करणाऱ्या दोन्ही संघाकडून चांगल्या चढाया झाल्या; मात्र समन्वयाचा अभाव व पासिंगमधील त्रुटींमुळे दोन्ही संघांना दबाव निर्माण करता आला नाही. पूर्वार्धात गोल शून्य राहिला. उत्तरार्धात बालगोपालकडून आक्रमक चढाया झाल्या. सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला जिबेलो याने गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात प्रॅक्टिसकडून जोरदार चढाई झाली. यात बालगोपालच्या आशिष कुरणे याने चेंडू हाताने हातळल्यामुळे प्रॅक्टिसला पेनल्टी बहाल करण्यात आली. प्रॅक्टिसच्या राहुल पाटील मारलेला चेंडू बालगोपालचा गोलरक्षक परमजित बगेल याने उत्कृष्टरीत्या रोखल्यामुळे प्रॅक्टिसला मिळालेली संधी वाया गेली. पुन्हा प्रॅक्टिसच्या सचिन गायकवाडने फटकवलेला चेंडू बालगोपालचा गोलरक्षक बगेल याने रोखला. सामन्याच्या ७८ व्या मिनिटाला बालगोपालच्या ऋतुराज पाटील याने गोल नोंदवत आघाडी २-० अशी केली. पाठोपाठ ८० व्या मिनिटाला जिबेलो याने वैयक्तिक दुसरा तर संघासाठी तिसऱ्या गोलाची नोंद केली. 

आजचा सामना 
संध्याकाळी चार - पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ

चौकट
मुख्य फेरीची तिकीट विक्री आजपासून
शुक्रवार (ता. १२) पासून सुरू होणाऱ्या स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या सामान्यांची तिकीट विक्री स्टेडियममध्ये उद्या (ता. ९) पासून सुरू होत आहे. २५ किंवा त्याहून अधिक तिकीट खरेदी केल्यास घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य फेरीत मोहामेडन (कोलकाता), केरळा स्टेट इलेक्ट्रीक सिटी बोर्ड, डेम्पो स्पोर्टस्‌, गोवा आणि रुटस् फुटबॉल क्लब, बंगळूर या संघांचा सहभाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com