पाऊस

पाऊस

कोल्हापूर फोटो 1586
...

जिल्ह्यात सर्वदूर वळीव पाऊस

बळीराजा सुखावला-जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह हजेरी

कोल्हापूर, ता. ८ : वळीव पावसाने आज शहर परिसर तसेच जिल्ह्यात हजेरी लावली. जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह झालेल्या वळीवाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. इचलकरंजीला पावसाने तासभर झोडपले. तर करवीर तालुक्यातील गणेशवाडी येथे वीज पडून नारळाचे झाड जळून खाक झाले.
....
कुंभी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

कुडीत्रेः कुंभी ,कुडीत्रे, सांगरूळ, वाकरे, दोनवडे परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे उस पिकाला आधार निर्माण झाला आहे. दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी सहा वाजतासोसाट्याचा वारा वाहू लागला. विजा चमकत रात्री साडे आठ वाजता पावसाला सुरवात झाली.

...
2213
गणेशवाडी येथे वीज पडून नारळाचे झाड खाक

कसबा बीड ः परिसरात सोमवारी सायंकाळी वळीव पावसाने हजेरी लावली. पाऊस कमी आणि विजांचा कडकडाट जास्त होता. कोगे, महे, कसबा बीड, गणेशवाडी, सावरवाडी, शिरोली दुमाला येथे अचानक विजा चमकत पाऊस पडला. हलक्या सरींनी केवळ दहा मिनिटे हजेरी लावली. पण विजा जोरदार चमकत होत्या. गणेशवाडी येथील तुकाराम माने यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली. जोरदार आवाज झाल्याने लोकांनी पाहिले असता नारळाचे झाड जळत होते.
.....
इचलकरंजीला पावसाने तासभर झोडपले

इचलकरंजी ः शहराला सोमवारी सांयकाळी जोरदार पावसाने झोडपले. विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर शहरातील बहुतांशी भागातील वीज पुरवठा बराच वेळ खंडीत झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसांने हुलकावणी दिली होती. तर आज दिवसभर आकाश ढगाळ झाले होते. सायंकाळी सात वाजता विजेचा कडकडाट सुरु झाला. त्यानंतर थोड्या वेळात पावसाने हजेरी लावली. एक सारखा पाऊस कोसळत राहीला. त्यामुळे सायंकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र मोठी तारांबळ उडाली. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे काही ठिकाणी वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. तासाभरानंतर पाऊस थांबल्यानंतर शहरातील वीज पुरवठा व जनजीवन पूर्ववत झाले.
...

....
हुपरी परिसरात वळीवाच्या सरी

हुपरीः परिसरात सायंकाळी साडेसातच्या सुमारास वळीवाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वळीवाच्या सरी कोसळल्या. सुमारे तासभर पाऊस झाला.दरम्यान, पावसाने वातावरणात गारवा निर्माण होऊन लोकांना दिलासा मिळण्याऐवजी उष्म्याच्या प्रमाणात अधिक वाढ झाली.
...

....
आजरा तालुक्यात हलक्या सरी
आजरा ः आजरा शहरासह तालुक्यातील काही गावांत वळीव पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवेत सुखद गारवा पसरला. गेले तीन -चार दिवस आकाशात ढगांची गर्दी दिसत होता, अंधारून येत होते. आज दुपारनंतर वातावरणात उष्मा वाढला होता. दोन वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. आजरा शहर, साळगाव, पेरणोली, शिरसंगी या परिसरात वळीवाच्या हलक्या सरी कोसळल्या.
...

फोटो chd86.jpg शिवणगे : अचानक आलेल्या वळीव पावसामुळे मेंढपाळांना स्मशान शेडमध्ये मेंढरांसह आसरा घ्यायची वेळ आली.
------
चंदगड शहर परिसराला वळीवाने झोडपले

चंदगड : शहर परिसराला आज दुपारी वळीव पावसाने झोडपून काढले. हवेतील वाढत उष्मा पाहता अनेक दिवसांपासून नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. सायंकाळी चारच्या सुमारास आभाळ भरून आले आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. चंदगड, नागणवाडी, कोणेवाडी, हलकर्णी फाटा, पाटणे फाटा, शिवणगे परिसरात हा पाऊस झाला. सुमारे तासभर झालेल्या पावसाने हवेत गारवा पसरला. हा पाऊस ऊस पिकासह मिरची, भुईमूग आदी उन्हाळी पिकांसाठी उपयुक्त ठरला.
...
भोगावती परिसरात विजांच्या कडकडाटासह हजेरी

राशिवडे बुद्रुक : भोगावती परिसरात विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाने हजेरी लावली. काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. राधानगरी तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. गेल्या महिन्याभरापासून हुलकावणी देणाऱ्या वळीव पावसाने अखेर आज विजांच्या कडकडाटात हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हा पाऊस ऊस पिकासाठी पोषक ठरला आहे.
...

कूर, मिणचे परिसरात तुरळक पाऊस
कोनवडेः भुदरगड तालुक्यातील कूर, मिणचेसह परिसरात सोमवारी (ता. ८) रात्री ९ च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. रात्री अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. ऊस, मक्का, भुईमूग, ज्वारी या पिकांसाठी हा पाऊस पोषक मानला जातो.
....
आसुर्ले-पोर्ले परिसरात दमदार पाऊस

पोर्ले तर्फ ठाणेः आसुर्ले-पोर्ले परिसरात अनेक दिवसांच्या हुलकावणीनंतर आज सायंकाळी सव्वासात वाजता वाऱ्यासह सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी चार वाजता पाऊस झाला.
...
माजगाव परिसरात पाऊस

माजगावःपन्हाळा तालुक्यातील माजगाव,पडळ,यवलूज, शिंदेवाडी परिसरात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी पावसाने हुलकावणी दिली होती. अर्धा तास दमदार पाऊस झाला. यामुळे हवेत गारवा झाला. वीट भट्टी मालकांची मात्र तारांबळ उडाली.
...
सिद्धनेर्लीसह परिसरात जोरदार वळीव

सिद्धनेर्ली ः सिद्धनेर्लीसह परिसरात सोमवारी रात्री जोरदार वळीवाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. वाढत्या उन्हामुळे पाण्याचा ताण पडणाऱ्या ऊस पिकासह इतर पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे. मात्र काढणी झालेल्या उन्हाळी हंगामातील पिकांचे या पावसामुळे नुकसान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com