कॅलीग्राफी

कॅलीग्राफी

01584
...

सुलेखनाची भरली अनोखी शाळा

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद- सलग सहा दिवस सहा कला प्रकारांचे प्रशिक्षण

कोल्हापूर, ता. ८ ः वळणदार अक्षर हा एक मुख्य संस्कार. त्यातही सुलेखन (कॅलिग्राफी) हा प्रकार साऱ्यांनाच भुरळ घालणारा. हाच कला प्रकार आज शालेय विद्यार्थ्यांनी सप्रयोग आत्मसात केला. निमित्त होते, छत्रपती शाहू मिलमध्ये आयोजित राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व सांगता कार्यक्रमांतर्गत कार्यशाळांचे. सलग सहा दिवस शालेय विद्यार्थ्यांसाठी सहा कलाप्रकारांच्या कार्यशाळा होणार असून त्याचा आजपासून प्रारंभ झाला. प्रा.राजेंद्र हंकारे यांनी मार्गदर्शन केले.
‘सुलेखन (कॅलीग्राफी) ही एक एक कला असून ती आत्मसात करण्यासाठी वयाचे बंधन नाही. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर व्यक्ती ही कला आत्मसात करु शकते. फक्त यासाठी जिद्द आणि सातत्य हवे. या कलेमुळे व्यक्तीला अमूल्य असे मानसिक समाधान लाभते. आत्मिक समाधानासाठी व्यक्तींनी या कलेकडे वळावे’, असे आवाहन यावेळी प्रा. हंकारे यांनी केले.
...
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
विविध कला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात. या पार्श्वभूमीवर सलग सहा दिवस पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम होणार आहे. छत्रपती शाहू मिलमध्ये सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत ही प्रशिक्षण सत्रे विनामूल्य होणार असून आवश्यक साहित्य संयोजन समितीकडून उपलब्ध केले आहे. उद्या (मंगळवारी) मंदार वैद्य यांची पेपरक्राफ्ट कार्यशाळा तर बुधवारी (ता.१०) सत्यजित निगवेकर यांची माती शिल्प कार्यशाळा होईल. अकरा मे रोजी गौरव काईंगडे यांची मातीकाम (पॉटरी कला) कार्यशाळा तर बारा मे रोजी चेतन चौगुले यांची चित्ररेखांकन आणि रंगकाम कार्यशाळा होईल. तेरा मे रोजी भाऊसाहेब पाटील यांचे ॲनिमेशन आणि कार्टून फिल्म निर्मितीवर कार्यशाळा होणार असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
...........

दत्तोबा दळवींच्या
स्मृतींना मिळाला उजाळा

प्रसिध्द चित्रकार (कै) दत्तोबा दळवी हे चित्रकलेतील कोल्हापूर स्कूलचे सच्चे पाईक. राजर्षी शाहू महाराजांचे दरबारी चित्रकार म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्याच माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यातील स्नेह अधिक वाढला होता. डॉ. आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराजांकडून मदत मिळण्यासाठीचा पत्रव्यवहारही (कै) दळवी यांच्याच माध्यमातून झाला होता. पुढेही त्यांचा पत्रव्यवहार सुरू होता. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या वडिलांचे तैलचित्र काढण्यासाठी (कै) दळवी यांना आठ मे १९२३ रोजी पत्राव्दारे विनंती केली होती. त्याला आज शंभर वर्षे पूर्ण झाली. त्याच्या स्मृतींनाही शाहू मिलमध्ये उजाळा मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com