खासगी चालकांचे गडहिंग्लजला आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी चालकांचे गडहिंग्लजला आंदोलन
खासगी चालकांचे गडहिंग्लजला आंदोलन

खासगी चालकांचे गडहिंग्लजला आंदोलन

sakal_logo
By

खासगी चालकांचे गडहिंग्लजला आंदोलन
तासभरप्रवाशांचा खोळंबा; आगारप्रमुखांच्या मध्यस्थीनंतर सेवा सुरळीत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : येथील एसटी आगारातील खासगी चालकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. पहाटे सहाला त्यांनी काम बंद केले. त्यामुळे कोल्हापूर नॉन स्टॉपला ब्रेक लागला. सुमारे तासभर या मार्गावरील गाड्या बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. आगारप्रमुखांच्या मध्यस्थीनंतर कोल्हापूर बससेवा सुरळीत झाली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सहा महिन्यापूर्वी नव्या बस सेवेत आणल्या आहेत. या गाड्यावर खासगी कंपनीचे चालक आहेत. गडहिंग्लज आगारात २४ बस आहेत. त्यावर ६० कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व गाड्या लांबपल्याच्या मार्गावर धावतात. गडहिंग्लज-कोल्हापूर या नॉनस्टॉप मार्गावर सात बस आहेत. अन्य बस पुणे, पंढरपूर, गाणगापूर, बीड यासह विविध मार्गावर धावतात.
खासगी कंपनीच्या चालकांची ठरल्यापेक्षा अधिक पीएफ कपात केली जाते. अपघात झाल्यास वाहनाची नुकसान भरपाई चालकाकडून वसूल केली जाते. याबाबी बंद कराव्यात. यासह अन्य मागण्यांसाठी त्यांनी आज सकाळी सहाला काम बंद आंदोलन सुरु केले. कोल्हापूर नॉनस्टॉप मार्गावर धावणाऱ्या दोन बस घेऊन जाण्यास नकार दिला. सुमारे तासभर कोल्हापूर मार्गावरील बस बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. नोकरी-व्यवसायानिमित्त कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांची गैरसोय झाली. अखेर आगारप्रमुख श्री. रणे यांच्या मध्यस्थीनंतर चालकांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
--------------
खर्चाची उचलली सामुहिक जबाबदारी
काही दिवसांपूर्वी एका बसचा किरकोळ अपघात झाला होता. यात २० हजारांचे नुकसान झाले. त्याची भरपाई करण्याची आर्थिक परिस्थिती संबंधित चालकाची नव्हती. त्यामुळे सर्व चालकांनी या खर्चाची सामुहिक जबाबदारी उचलल्याचे एका चालकाने सांगितले. नुकसान भरपाईची अट अडचणीची ठरत असल्याचे मत चालकांनी व्यक्त केले.