टेक्नोक्रॅट स्पर्धेत १०२० विद्यार्थी सहभागी

टेक्नोक्रॅट स्पर्धेत १०२० विद्यार्थी सहभागी

jsp920
01651
यड्राव ः येथे स्पर्धेत विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट पाहताना अनिल बागणे, प्राचार्य, समन्वयक आदी.

टेक्नोक्रॅट स्पर्धेत १०२० विद्यार्थी सहभागी
दानोळी, ता. १० ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये ‘टेक्नोक्रॅट २०२३’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेला महाराष्ट्र, कर्नाटक व सीमाभागातून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत १०२० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यकारी संचालक अनिल बागणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. प्राचार्य बी. एस. ताशीलदार आदी उपस्थित होते.
श्री. बागणे म्हणाले, की स्पर्धेमुळे सहभागी विद्यार्थ्यांमधून नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी प्रेरणा मिळेल. शरद पॉलिटेक्निकलने अशा विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेऊन जगाच्या पाठीवर नाव मिळवावे.
स्पर्धेत मेकॅनिकल विभागात शरद पॉलिटेक्निकच्या ‘इलेक्ट्रिक सायकल विथ हॅण्ड होई’ या प्रकल्पास, सिव्हिल विभागात ‘झीरो वेस्ट इनिशिएटिव्ह फॉर ग्रीन अॅण्ड क्लीन कॅम्पस’ या प्रकल्पास, कॉम्प्युटर, आयटी आणि आर्टिफिशल इंटेलिजेन्स अॅण्ड मशिन लर्निंग विभागात शरद पॉलिटेक्निकच्या ‘ब्रेन ट्युमर डिटेक्शन युझिंग सी.एन.एन. मॉडेल’ या प्रकल्पास, मेकॅट्रॉनिक्स विभागात ‘सीआरबी बॉलफीडिंग ऑटोमेशन’ या प्रकल्पास, इलेक्ट्रिकल विभागात शरद पॉलिटेक्निकच्या ‘डिझाईन अॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ अँटी टेररिसम् ग्राउंड व्हेईकल’ तसेच इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागात ‘व्हर्च्युअल रोबोट’ या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय व प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे मिनी प्रोजेक्ट स्पर्धेचेही आयोजन केले होते.
विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्रा. बिपीन पाटील यांनी स्पर्धेचे समन्वयन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com