राजाराम अध्यक्ष अमल महाडिक

राजाराम अध्यक्ष अमल महाडिक

01782

‘गोकुळ’मध्ये लेखापरीक्षण सुरूच
राहणार ः खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर, ता. ९ : ‘गोकुळ’च्या दुधाची प्रत बिघडली आहे. ब्रँडवरही परिणाम होत आहे. गोकुळ लेखापरीक्षण होऊ नये यासाठी सत्ताधारी नेत्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच न्यायालयात दाद मागितली; पण लेखापरीक्षण व्हावे, यासाठी न्यायालयाने आदेश दिले आहेत. ‘गोकुळ’मध्ये लेखापरीक्षण सुरूच राहणार असून, यातून गैरकारभार आहे किंवा नाही, हे समजणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची आज निवड झाली. यावेळी ते बोलत होते.
खासदार महाडिक म्हणाले, ‘छत्रपती राजाराम कारखान्याची निवडणूक राज्यभर गाजली. २८ वर्ष महादेवराव महाडिक आणि शेतकऱ्यांची सत्ता होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती, मात्र माजी पालकमंत्र्यांनी निवडणूक लादली. कंडका पाडायचं, आमच ठरलंय म्हणून लोकांना वेठीस धरले जात होते. याला सभासदांनी जुमानले नाही. अमल महाडिक संयमी आणि शांत नेतृत्व आहे. कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी टीकात्मक प्रचार केला. अपप्रचार आणि वैयक्तिक पातळीवर प्रचार केला. त्याला सभासदांनी दाद दिली नाही. आमदार सतेज पाटील यांनी अमल महाडिक यांना २६ प्रश्‍न विचारले होते. त्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली. पण, अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांना विचारलेल्या ५ प्रश्‍नांची उत्तरे अद्यापही दिलेली नाहीत. भविष्यात या प्रश्‍नांची उत्तरे अजूनही द्यावीत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली असणारे पॅनेल २१-० मताधिक्याने विजयी झाले आहे. त्यामुळे नूतन अध्यक्ष अमल महाडिक यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. निवडणुकीदरम्यान अमल महाडिक यांनी सभासदांना दिलेले को-जनसह इतर शब्द ते पूर्ण करतील’
‘गोकुळ दूध संघ सर्वसामान्य लोकांची जीवनदायिनी आहे. ‘गोकुळ’मधून शेतकऱ्यांना दहा दिवसाला पैसे मिळतात. महादेवराव महाडिक आणि आमदार पी.एन.पाटील यांनी गोकुळ हा जागतिक ब्रँड केला आहे. दीड-दोन वर्षात सत्ताधाऱ्यांचा चुकीचा कारभार समोर येत आहे. शौमिका महाडिक यांनी लेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे. लेखापरीक्षणानंतर गोकुळमध्ये गैरकारभार आहे किंवा नाही, हे लक्षात येणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

चौकट
‘फूटवेअर ब्रिजचा पाठपुरावा सुरू’
रेल्वे फूटवेअर ब्रीज झाला पाहिजे. रेल्वे रुळावरून भिंत घातल्यामुळे नागरिकांना अडचण होते, हे खरे आहे; पण यामध्ये धोकाही आहे. त्यामुळे ही भिंत घातली आहे. दरम्यान, दिल्ली दरबारी याचा पाठपुरावा सुरू असून, लवकरच फूटवेअर ब्रिज सुरू केला जाईल, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com