शिवाजी विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन
शिवाजी विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

शिवाजी विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

sakal_logo
By

01684
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात मंगळवारी कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांना
शिवाजी विद्यापीठात अभिवादन
कोल्हापूर : थोर समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी विद्यापीठात मंगळवारी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात सकाळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील कर्मवीर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले. या वेळी वित्त व लेखा अधिकारी अजित चौगुले, उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. संभाजी शिंदे, डॉ. जगदीश सपकाळे, धनश्री शिंदे, विद्या चौगुले, पी. टी. पाटील, अभिजीत पाटील, सुमंत दंडपठ, सुनिल जाधव, आनंदा वारके उपस्थित होते.