आजरा ः प्रारुप आराखडा सुनावनी

आजरा ः प्रारुप आराखडा सुनावनी

आजऱ्याच्या प्रारुप आराखड्यावरील
73 तक्रारीवर झाली सुनावणी
आजरा, ता. 28 ः आजरा शहराचा प्रारुप विकास आराखड्यावर नागरिकांतून आलेल्या 73 तक्रारीवर सोमवारी (ता.8) आजरा नगरंपचायत कार्यालया मधील (कै) काशिनाथअण्णा चराटी सभागृहात नियोजन समितीसमोर सूनावनी झाली. नगरपंचायत प्रशासनाकडे शहरातून 74 तक्रारी आल्या होत्या. सोमवारी दिवसभर सुनावनी झाली. एक तक्रारदार उपस्थित नव्हते. शहराचा प्रारुप विकास आराखडा अधिसुचना (ता. 9) फेब्रुवारीला राज्य शासनाच्या राज्यपत्र पुणे विभाग पुरवणी भाग 1 मध्ये प्रसिध्द केली होती. आजरा नगरपंचायतीने प्रारुप आराखडा नगरपंचायत कार्यालयात प्रसिध्द केला होता. नियोजन समिती सदस्य निशिकांत गुरुले ( आर्किटेक्ट), आर. व्ही. पाटील , एम. टी. यादव ( निवृत्त सहसंचालक) या नियोजन समिती सदस्यासमोर सुनावणी झाली. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अशोक चराटी, किरण कांबळे,अशासकीय सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com