
कर्मचार्यांच्या १८ मे ला बदल्या
लोगो- जिल्हा परिषद
कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची तयारी सुरू
कोल्हापूर, ता.९: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या १८ व १९ मे रोजी करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रशासकीय व विनंती बदल्यांचा समावेश आहे. साधारण २०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. ही बदली प्रक्रिया पार पाडण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांकडून माहिती संकलित करण्यास सुरुवात झाली आहे.
दरवर्षी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या जातात. कोरोनामुळे मागील दोन-तीन वर्षांत या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे शेकडो कर्मचारी बदलीस पात्र असतानाही एकाच जागेवर ठाण मांडून आहेत. यावेळी मात्र त्यांना बदलीस सामोरे जावे लागणार आहे. प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी ज्या त्या विभागाकडून सादर केली जात आहे. बदली होणारे कर्मचारी, त्यानुसार होणाऱ्या रिक्त जागा यांची माहिती संकलित होत आहे. यावर्षी प्रशासकीय व विनंती अशा दोन्ही बदल्या केल्या जाणार आहेत. सोयीची जागा मिळावी यासाठी आत्तापासूनच कर्मचारी प्रयत्नात आहेत.