
संक्षिप्त पट्टा
01767
कोल्हापूर ः छत्रपती शाहू मिलमध्ये आयोजित ग्रंथ महोत्सवात बालभारतीच्या स्वाध्यायपुस्तिकांना मागणी आहे.
‘बालभारती‘च्या स्वाध्यायपुस्तिकांना मागणी
कोल्हापूर ः छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती शाहू मिल येथे सुरू असलेल्या ग्रंथ महोत्सवात ‘बालभारती‘च्या स्वाध्यायपुस्तिकांना मागणी वाढली आहे. आठवी ते बारावीसाठीच्या या स्वाध्यायपुस्तिका असून त्या विद्यार्थ्यांना सरावासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे या स्टॉलवर गर्दी आहे.
----------
01768
कोल्हापूर ः जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा रज्जू कटारिया यांना आदर्श महिला पुरस्काराने गौरवण्यात आले.
रज्जु कटारिया यांचा पुरस्काराने सन्मान
कोल्हापूर ः येथील जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा रज्जु कटारिया यांच्या तीन वर्षातील कार्याची दखल घेवून महाराष्ट्र विभागातर्फे सर्वोत्कृष्ट अध्यक्षा व आदर्श महिला पुरस्काराने गौरवण्यात आले. सोलापूर येथे हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष उन्मेश कर्नावट, प्रीतिजी कर्नावट, बिरेन शाह, लालचंद जैन, महावीर पारेख, मनेश शाह आदी उपस्थित होते. विभागीय सचिव दिलीप चोरबेले यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.