Sat, Sept 23, 2023

कॅम्प
कॅम्प
Published on : 9 May 2023, 3:26 am
विशेष कॅम्पमध्ये १८ बांधकाम परवानगी
कोल्हापूर, ता. ९ : प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी दोन दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये १८ बांधकाम परवानगी व १७ भोगवटा प्रमाणपत्रे मंजूर करण्यात आली. ४२ प्रकरणांची छाननी करून ३५ मंजूर करण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी बांधकाम परवानगी व भोगवटा घेतलेला नाही अशांसाठी दोन दिवसांचा कॅम्प नगररचना कार्यालयामध्ये आयोजित केला होता. प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता नारायण भोसले, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, महादेव फुलारी, सुरेश पाटील, सुनील भाईक, चेतन आरमाळ, अक्षय आटकर, मयुरी पटवेगार आदींनी कामे तपासून सादर केली.