विद्यापीठातील ११ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५१३ परीक्षार्थी

विद्यापीठातील ११ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५१३ परीक्षार्थी

११ अभ्यासक्रमांसाठी १५१३ परीक्षार्थी
प्रवेश परीक्षा; हिवाळी सत्रातील सहा परीक्षांचे निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः शिवाजी विद्यापीठातील विविध ११ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मंगळवारी दिवसभरातील तीन सत्रांमध्ये एकूण १५१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली, तर ८० जण गैरहजर राहिले.
विद्यापीठातील अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील संलग्नित महाविद्यालयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना नियमित प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. त्यात मंगळवारी एम. ए. मास कम्युनिकेशन, एमसीए सायन्स, एम. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, ॲग्रो केमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एम. टेक. (रुरल टेक्नॉलॉजी), बीजेसी., एम. एस्सी. स्टॅटेस्टिक, बॉटनी, इलेक्ट्रॉनिक्स, बी. लिब. सायन्स या विषयांसाठी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच यावेळेतील विविध तीन सत्रांमध्ये परीक्षा झाली. दरम्यान, ऑक्टोबर-नोव्हेंबर हिवाळी सत्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या. त्यातील सहा अभ्यासक्रमांचे ऑनलाईन निकाल विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने मंगळवारी जाहीर केले. त्यात बी. व्होक. न्यूट्रीशन अँड डायट, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशन, केन ॲग्री अँड शुगरटेक या अभ्यासक्रमांच्या विविध सत्रांचा समावेश आहे.

चौकट
‘एमएचटी-सीईटी’ परीक्षा सुरू
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) मंगळवारपासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात पीसीएम ग्रुपची परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील वाठार तर्फ वडगाव, इचलकरंजी, साळोखेनगर, जयसिंगपूर, प्रयाग चिखली, उचगाव, पन्हाळा, महागाव, वारणानगर येथील केंद्रांवर सकाळी साडेसात ते दुपारी बारा आणि दुपारी साडेबारा ते सायंकाळी पावणेसात अशा सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी एकूण ९६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com