आमदार सचिन अहिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार सचिन अहिर
आमदार सचिन अहिर

आमदार सचिन अहिर

sakal_logo
By

01776

महाविकास आघाडी
भक्कमच ः सचिन अहिर

कोल्हापूर, ता.९ : महाविकास आघाडी भक्कम असून, बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये याचा अनुभव आलेला आहे.  राज्यभरात सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा वेळेवरच होतील. तसेच स्थानिक स्तरावरच्या नगरपालिका किंवा महापालिका  निवडणुका एकत्रितपणेच लढवल्या जातील, असे मत उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. कोल्हापूर दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांची भेटीनंतर श्री अंबाबाई देवीचे दर्शन त्यांनी घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रत्येक पक्षाची काही वेगळी धोरणे असली तरी महाविकास आघाडीमधील पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय पवार, रवीकिरण इंगवले आदी उपस्थित होते.