जीपीएस अत्यावश्‍यक

जीपीएस अत्यावश्‍यक

गौण खनिज वाहतूक वाहनांवर ''जीपीएस''
न बसविल्यास तीन लाखाचा दंड ः शिंदे

कोल्हापूर, ता. ९ : जिल्ह्यात गौण खनिजाचे वाहतूक करताना जीपीएस सिस्टिम बसवणे गरजेचे आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर ''जीपीएस'' बसवणे गरजेचे आहे. जो वाहनधारक जीपीएस सिस्टिम बसणार नाही, त्यांना तीन लाखाचा दंड भरण्यास तयार रहावे, असा इशारा अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी आज खाणपट्टाधारक व कुशरचालकांना आज दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील खाणपट्टाधारक व कुशरधारकांची आज सर्व विषयांवर चर्चा झाली. यावेळी ते बोलत होते.
अपर जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, ‘राज्यात गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. हेच नियम कोल्हापूर जिल्ह्यात तंतोतंत पाळले जावेत. यासाठी, शासन नियमानूसार गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर १ मे पासून ''जीपीएस'' प्रणाली बसविणे बंधनकारक केले आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक वाहनांवर ही प्रणाली कार्यान्वीत केलेली नाही. ही गंभीर बाब असून, शासन अशा वाहनधारकांविरूध्द कडक कारवाई करण्याच्या सूचना देत आहे. त्यानूसार त्याची तात्काळ अमलबजावणी केली जाईल.’
जिल्हा खनिकर्म अधिकारी पाटील म्हणाले, ‘जीपीएस प्रणालीची किंमत खूप कमी आहे. वाहनधारकांना ५ ते ७ हजारपर्यंत ही प्रणाली मिळू शकते. दंडाच्या तुलनेत ही रक्कम खूपच नगण्य आहे. त्यामुळे वाहनधारकांनी ती आपल्या वाहनावर बसवून घ्यावी. सरकारच्या या निर्णयाकडे कोणीही नकारात्मक दृष्टीने पाहू नये. जर ही जीपीएस बसविणार नसाल तर कारवाई ही केलीच जाईल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com