शाहू कृतज्ञता पर्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू कृतज्ञता पर्व
शाहू कृतज्ञता पर्व

शाहू कृतज्ञता पर्व

sakal_logo
By

01711 01788

ओरिगामी कलेतून
मुलांनी साकारल्या कलाकृती

‘महाराष्ट्राची लोकधारा’मधून मराठी संस्कृतीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व सांगता कार्यक्रमांतर्गत आज छत्रपती शाहू मिलमध्ये झालेल्या ओरिगामी कार्यशाळाने शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंदार वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली कागदापासून नाविन्यपूर्ण जपानी ओरिगामी कलाकृती बनवण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. दरम्यान, सायंकाळच्या सत्रात झालेल्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातून मराठमोळी संस्कृती उलगडली.
ओरिगामीचा वापर कलात्मकता जोपासण्याबरोबरच मनःशांतीसाठीही अत्यंत सोप्या पद्धतीने कशापद्धतीने करता येतो, याचा अनुभव यानिमित्ताने मुलांनी घेतला. उद्या (बुधवारी) सकाळी साडेदहाला शालेय विद्यार्थ्यांसाठी शिल्पकार सत्यजित निगवेकर यांची माती शिल्प कार्यशाळा होणार आहे. दुपारी दोन वाजता ‘महात्मा फुले’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत कार्यक्रम होणार आहे. गुरूवारी (ता.११) गौरव काईंगडे यांची मातीकाम (पॉटरी कला) कार्यशाळा तर शुक्रवारी (ता.१२) चेतन चौगुले यांची चित्ररेखांकन आणि रंगकाम कार्यशाळा होईल. शनिवारी (ता.१३) भाऊसाहेब पाटील यांचे ॲनिमेशन आणि कार्टून फिल्म निर्मिती आणि त्यातील चित्रकलेचे योगदान याविषयी कार्यशाळा होईल. सर्व कार्यशाळा विनामूल्य असून, त्यासाठी आवश्यक साहित्य संयोजकांतर्फे दिले जाते.
दरम्यान, येथे चर्मोद्योग महामंडळाच्या विविध योजनांची माहिती व उत्पादन केंद्रामधील कोल्हापूरी चप्पल विक्रीसाठी स्टॉल असून, कापड, आब्यांची जत्रा, ग्रंथ व बचतगटांच्या उत्पादनांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रंथ प्रदर्शन, दुर्मिळ शस्त्रास्त्रे, शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे, रोबोटिक साहित्यांचे तसेच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती देणारे चित्र प्रदर्शनही येथे भरवले आहे. अधिकाधिक कोल्हापूरकरांनी महोत्सवाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.