ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःचे नेतृत्व करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःचे नेतृत्व करा
ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःचे नेतृत्व करा

ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःचे नेतृत्व करा

sakal_logo
By

01791

ध्येय साध्य करण्यासाठी स्वतः नेतृत्व करा
---
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के; पाचगणीत शिवाजी विद्यापीठाच्या शिबिरास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः वेगवेगळ्या प्रकारचे नेतृत्व करण्याची क्षमता प्रत्येकात कमी-अधिक प्रमाणात असते. त्या क्षमतेचा वापर सर्वांत आधी आपण स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी करण्याची गरज असते. आपल्या आयुष्यात आपण जे ध्येय बाळगले आहे, ते साध्य करण्यासाठी आपण स्वतःचे नेतृत्व करण्यास शिकले पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल (ता. ८) केले.
शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पाचगणी (ता. वाई, जि. सातारा) येथील बहाई ॲकॅडमीतर्फे आयोजित नेतृत्व विकास शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. बहाई ॲकॅडमीचे संचालक डॉ. लेसन आझादी म्हणाले, की विद्यार्थिदशेपासूनच आपण सकारात्मक पद्धतीने आपल्यातील विविध कलागुणांचा, नेतृत्वगुणांचा विकास केला पाहिजे. प्रत्येकाने नेताच व्हायला पाहिजे, असे अपेक्षित नसले तरी प्रत्येक जण एक चांगला माणूस मात्र निश्चितच व्हायला हवे. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पराग तांदळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रल्हाद माने यांनी आभार मानले.