तरुणाला मारहाण

तरुणाला मारहाण

टोळी वादातून तरुणाला मारहाण
कोल्हापूर, ता. ९ ः तू आमच्या गँगमध्ये आहेस. मग त्या विरोधी गँग मध्ये का असतोस, असा जाब विचारून तरुणाला पाच जणांनी जबर मरहाण केली. अमन सत्तार इनामदार (वय १९ रा. सदर बाजार, विचारेमाळ) असे या तरुणाचे नाव आहे. सोमवारी (ता.८) दुपारी सदरबजार येथे ही घटना घडली. याप्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी फिरोज शेख, पियुष, ऋषीकेश कांबळे, सौरभ कोळी, जाकी, रियाज (सर्व रा. सदर बाजार ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारी अमन इनामदार हा घराच्या दारात रस्त्यावर बसला होता. यावेळी पाचही संशयित त्या ठिकाणी आले. त्यांनी अमनला तू गब्बर सुर्यवंशी गँगसोबत का फिरतोस अशी विचरणा करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच फिरोज शेख याने अमनवर चाकूने वार करुन त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. त्याला तू परत गब्बर सुर्यवंशी गँगबरोबर फिरताना दिसलास तर तुला ठार मारीन अशी धमकी दिली. तसेच अमनला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून कसबा बावडा मार्गे वडणगे येथे आणून सोडले. यानंतर अमन इनामदार जखमी अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल झाला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com