
विकास आराखडा निवेदन
फोटो क्रमांक : gad101.jpg
01913
गडहिंग्लज : मिळकतधारकांवर अन्याय न होता विकास आराखड्याची रचना असावी, या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने नियोजन समितीला दिले.
---------------------------------------------
मिळकतधारकांवर अन्याय नको
शिष्टमंडळाचे मत ; विकास आराखड्याबाबत समितीला निवेदन
गडहिंग्लज, ता. १० : शहराच्या वाढीव हद्दीचा प्रारूप विकास आराखडा अधिक निर्दोष, पारदर्शक आणि मिळकतधारकांवर कोणताही अन्याय न करणारा असावा, असे मत माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने व्यक्त केले. याबाबत नियोजन समितीच्या सदस्यांना वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यासाठी सूचनांचे निवेदन देण्यात आले.
वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यात मिळकतधारकांवर अन्याय झाल्याचे चित्र आहे. खासगी जमिनीवरच अधिकाधिक आरक्षणे निश्चित केल्याने शेतकरी व मिळकतधारक अडचणीत आले आहेत. यामुळे हरकती वाढल्या आहेत. त्या अनुषंगाने माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, नितीन देसाई, नरेंद्र भद्रापूर, चंद्रकांत सावंत यांच्या शिष्टमंडळाने नियोजन समितीच्या सदस्यांची भेट घेऊन चर्चा केली. विकास आराखडा सर्वसमावेशक असावा. तो पारदर्शक आणि सर्व घटकांचा समाधान करावा राहावा. कोणावरही अन्याय न होता सर्वसमावशेक विकास साधणाऱ्या आराखड्यासाठी पूर्ण ताकदीने जनतेच्या पाठीशी उभारण्याचा निर्धारही कोरी यांनी यावेळी केला. यावेळी शेकडो नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी हणमंतराव साठे, महेश शिंदेंसह नागरिक उपस्थित होते.