Mon, Sept 25, 2023

गुन्हेगारी वृत्त
गुन्हेगारी वृत्त
Published on : 10 May 2023, 2:43 am
विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर ः विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अभिषेक आनंदा सुंबे (वय २०, रा. कदमवाडी) याचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीपीआर पोलिस चौकीत याची नोंद झाली आहे. वडणगे येथे एका हॉटेलजवळ अभिषेकने २३ एप्रिलला विष प्राशन केले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. बुधवारी दुपारी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
----
हुजूर गल्लीत वृद्धाची आत्महत्या
कोल्हापूर ः भाऊसिंगजी रोडवरील हुजूर गल्ली येथील अनिल आरमुगन नायडू (वय ६८) यांनी आत्महत्या केली. बुधवारी दुपारी राहत्या घरी त्यांनी तुळईला गळफास घेतला. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.